E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
म्युच्युअल फंड्सला झुकते माप
Wrutuja pandharpure
30 Jun 2025
अंतरा देशपांडे
म्युच्युअल फंड ही संकल्पना भारतात येऊन बरीच वर्षे झाली. भारत सरकारने रिझर्व बँक ऑफ इंडियाद्वारे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (यूटीआय) ची 1963 मध्ये स्थापना केली. ’यूएस-64’ ही पहिली योजना 1964 मध्ये सुरु झाली. 1993 पासून खाजगी कंपन्यांनाही म्युच्युअल फंड चालवण्याची परवानगी मिळाली आणि तेव्हापासून 2025 पर्यंत या क्षेत्रात लक्षणीय वाढ आणि कामगिरी दिसून येते.सध्या भारतात 44 नोंदणीकृत म्युच्युअल फंड एसेट मॅनेजमेंट कंपन्या (एएमसी) आहेत. या कंपन्या विविध म्युच्युअल फंड योजना आणि गुंतवणूक उत्पादने व्यवस्थापित करतात.
मागील आठवड्यात फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया म्युच्युअल फंडने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) गेल्या 10 वर्षांत 20 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) आणि गेल्या 5 वर्षांत 24 टक्के सीएजीआर वाढ झाली आहे. (*सीएजीआर म्हणजे चक्रवाढ वार्षिक वाढ दर, एका विशिष्ट कालावधीत गुंतवणुकीचा सरासरी वार्षिक वाढ दर, असे गृहीत धरून की नफा पुन्हा गुंतवला जातो.)
हा उद्योग सध्या 72.2 लाख कोटी रुपयांच्या उच्चतम एयूएमवर पोहोचला आहे. मागील वर्षभरात देशांतर्गत म्युच्युअल फंड उद्योगाने 13.3 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवली आहे. मे 2025 पर्यंत एयूएमने मागील 5 वर्षांत 24 टक्के सीएजीआर आणि मागील 10 वर्षांत 20 टक्के सीएजीआर वाढ नोंदवली आहे.
म्युच्युअल फंडांमध्ये परदेशी गुंतवणूक (एफपीआय) आणि देशांतर्गत गुंतवणूकदार (डीआयआय) या दोघांचाही सहभाग असतो. पूर्वी परदेशी गुंतवणुकीचा पगडा मोठा होता; पण गेल्या 5 ते 6 वर्षांत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठी वाढ दर्शवली आहे.
मासिक गुंतवणूक (एसआयपी) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मे 2025 पर्यंतच्या 12 महिन्यांत डीआयआय कडून निव्वळ गुंतवणूक 6 लाख कोटी रुपये होती, तर एफपीआयकडून 3.1 लाख कोटी रुपये निव्वळ गुंतवणूक झाली. भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या एयूएमचे बँक ठेवींशी तुलना केल्यास, गेल्या 10 वर्षांत याचे प्रमाण 3 पटीने वाढले आहे. 2015 मध्ये हे प्रमाण 12.6 टक्के होते, जे मे 2025 मध्ये 31 टक्क्यांहून अधिक झाले आहे. सध्याचा एमएफ एयूएम बँक ठेवींच्या सुमारे एक तृतीयांश आहे. मे 2025 मध्ये एकूण गुंतवणूकदारांची संख्या 5.49 कोटींवर पोहोचली असून, याच महिन्यात सुमारे 3.19 लाख नवीन गुंतवणूकदार जोडले गेले. गेल्या 12 महिन्यांत 89 लाख नवीन गुंतवणूकदार जोडले गेले, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या 78 लाख होती.
म्युच्युअल फंड उद्योग भारतातील टॉप 15 शहरांच्या पलीकडेही विस्तारत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरात ही एयूएम निर्मितीच्या बाबतीत अव्वल 4 राज्ये आहेत; परंतु वाढीच्या टक्केवारीत तेलंगणा (32.08 टक्के) आणि हरियाणा (27.90 टक्के) मध्ये वर्षभरात सर्वाधिक सरासरी एएयूएम वाढ नोंदवली गेली आहे. या आकडेवारीवरून भारतीय गुंतवणूकदारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील वाढता विश्वास स्पष्ट होतो. पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा आधुनिक गुंतवणूक मार्ग स्वीकारण्याकडे लोकांचा कल झुकत आहे.
Related
Articles
प्रसिद्ध कृष्णाऐवजी अंशुल कंबोजला पहिली पसंती
23 Jul 2025
पूजा खेडकरचे नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र रद्द
24 Jul 2025
आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
23 Jul 2025
बळींची संख्या ३१ वर
23 Jul 2025
एअर इंडियाच्या विमानांचे इंधनपुरवठा स्वीच निर्दोष
23 Jul 2025
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सत्कार
25 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर