इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात ६२ जणांचा मृत्यू   

डेअर अल बालेह : गाझा पट्टीत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ६२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. एकीकडे मानवी मदतीसाठी आणि संषर्षबंदीसाठी आतुरतेने नागरिक वाट पाहात असताना पुन्हा हवाई हल्ला झाला आहे. 
 
इस्रायलने शुक्रवारी रात्रीपासून हवाई हल्ल्यांना सुरुवात केली. शनिवारी देखील ते सुरू आहेत.  गाझातील स्टेडियम जवळच्या जागेत अनेक नागरिकांनी आश्रय घेतला होता. तेथेच काल सकाळी हवाई हल्ला झाला होता. तेथे आठ जणांचा तर दक्षिण गाझाजवळच्या मुसावी येथील हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला. 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास आणि इस्रायल यांच्यात येत्या आठवड्यात संघर्षबंदी केली जाईल, अशी घोषणा नुकतीच केली. ओव्हल येथील कार्यालयात ट्रम्प यांना याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, गाझासाठी आम्ही कार्य करत आहोत. काळजी नक्कीच घेतली जाईल.  यानंतर इस्रायलकडून पुन्हा हवाई हल्ला झाल्यामुळे संघर्षबंदीचे काय होणार ? असा प्रश्न नागरिकांसह जगाला देखील पडला आहे. 
 
दरम्यान, मार्चमध्ये गाझातील संघर्षबंदी मोडीत काढून इस्रायलने आक्रमक हवाई हल्ले सुरू केले होते. ५० ओलिसांची सुटका तातडीने करावी, अशी मागणी केली आहे. आतापर्यंत २५० ओलिसांची सुटका हमास दहशतवाद्यांनी केली आहे. दरम्यान, २१ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे आतापर्यंत ५६ हजारापेक्षा अधिक पॅलेेस्टिनी नागरिक हल्ल्यात ठार झाले असून लाखोच्या संख्येने स्थलांतरीत झाले आहेत. मदत वेळेवर आणि अपुरी असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. इस्रायली सैनिक गोेंधळ घालणार्‍यांवर थेट गोळीबार करत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. 

Related Articles