आम्ही बुमराला घाबरत नाही : स्टोक्स   

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. लीड्सच्या मैदानातून दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या हंगामाची सुरुवात करतील. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटीच्या नव्या पर्वाची विजयाने सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असेल. या आव्हानात्मक दौर्‍यात जसप्रीत बुमराह फक्त तीन सामनेच खेळणार आहे. त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील.
जसप्रीत बुमरा हा भल्या भल्या फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करण्यात सक्षम असणारा गोलंदाज आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघात त्याची धास्ती असते. पण इंग्लंडच्या कर्णधाराने पहिल्या कसोटी सामन्याआधी बुमरा संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. आमच्या ताफ्यात जसप्रीत बुमराची भीती नाही, असे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने म्हटले आहे. 
 
बुमरा हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज असला तरी तो एकट्याच्या जोरावर टीम इंडियाला जिंकून देऊ शकत नाही, असेही बेन स्टोक्स म्हणाला आहे. 
लीड्सच्या हेडिंग्ले कसोटी आधी बेन स्टोक्सने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बुमराहच्या गोलंदाजीसंदर्भात तो म्हणाला आहे की, आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने सर्वोत्तम संघाविरुद्ध सामने खेळ असतो. तो एक सर्वोत्तम गोलंदाज आहे. 
 
टीम इंडियासाठी तो काय करू शकतो याची आम्हाला कल्पना आहे.  पण त्याचा सामना करण्यासाठी आमच्या ताफ्यात अजिबात भीतीचे वातावरण नाही. मला वाटतं एक गोलंदाज एकट्याच्या जोरावर संघाला मालिका जिंकू देऊ शकत नाही. मालिका जिंकण्यासाठी सर्व ११ खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे असते. जसप्रीत बुमरा हा इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याच्या खात्यात ६० बळी जमा आहेत. इंग्लंडच्या मैदानात ९ कसोटी सामन्यात बुमराहने ३७ बळी घेतल्या आहेत. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंड दौर्‍यावर तो फक्त ३ सामने खेळताना दिसू शकतो. या ३ सामन्यात तो संघासाठी दमदार कामगिरी करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

Related Articles