इस्रायलने जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणले : पुतीन   

मास्को : इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्ष सहाव्या दिवशी आणखी विकोपाला गेला. इस्रायलने जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणले असल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे.
 
दुसरीकडे, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई रबायकोव यांनी अमेरिकेला स्पष्ट इशारा देताना इस्रायलला कोणत्याही प्रकारची लष्करी मदत करु नये, असे म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणच्या युद्धात उडी घेतली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खान खोमेनी कुठे लपले आहेत, हे आम्हाला माहिती आहे. सध्या तरी त्यांना ठार मारायची इच्छा नाही, असा इशारा ट्रम्प यांनी जी-७ ची परिषद आटोपती घेताना दिला आहेे. 
 

Related Articles