E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
चांदोबाचा लिंबमध्ये पहिले उभे रिंगण
Samruddhi Dhayagude
28 Jun 2025
भक्तिपूर्ण वातावरणात नेत्रदीपक सोहळा; दोन अश्वही धावले
सातारा, (प्रतिनिधी) : टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष सरू असतानाच माउलींचा व स्वाराचा असे दोन्ही अश्व एकामागून एक दौडले आणि माउली, माउली नामाचा जयघोष सुरू झाला. अशा भक्तिपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहात शुक्रवारी पार पडले. त्यानंतर सायंकाळी सोहळा तरडगाव मुक्कामी विसावला.
लोणंद-फलटण मार्गावर दुपारी २.३० वाजता सरदेचा ओढा, कापडगाव येथे फलटण तालुक्याच्या सीमेवर सोहळ्याचे फलटण तालुकावासीयांनी वारकर्यांचे स्वागत केले. त्यामध्ये आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, फलटण बाजार समितीचे संचालक प्रवीण खताळ यांच्यासह फलटण व खंडाळा तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
उभ्या रिंगणासाठी दुपारी अश्व चांदोबाचा लिंब येथे दाखल झाले. राजाभाऊ चोपदार यांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी सव्वा चार वाजता रिंगणासाठी अश्व सोडण्यात आले. अश्व रथा पुढील २७ दिंड्या पार करून रथाच्या दिशेने धावत गेले. समोर स्वाराचा अश्व तर मागे माउलींचा अश्व दौडत होता. वारकर्यांच्या मुखी माउली माउली नामाचा जयघोष आणि साथीला टाळ, मृदुंगाचा गजर सुरू होता. अशा वातावरणातच स्वाराचा व माउलींचा अश्व रथा मागे २० दिंड्यांपर्यंत जावून पुन्हा माउलींच्या रथाकडे आले. वारकर्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत दोन्ही अश्व माउलींना प्रदक्षिणा घालून व नारळ प्रसाद घेऊन गर्दीतून वाट काढत सोहळ्याच्या अग्रभागी पोहोचले. रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला.
रिंगण सोहळा पाहण्यासाठी आणि माउलींचे दर्शन घेण्यासाठी लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगाव, परहर खुर्द, हिंगणगाव, रावडी, माळेवाडी, शिंदेमाळ आदी गावातील हजारो भाविक उपस्थित होते. लोणंद ते तरडगाव या वाटचालीत विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व भाविकांनी माउलींसह सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले.
Related
Articles
रावेतमधील जाधव वस्तीतील एसआरए प्रकल्पाची चौकशी करा
20 Jul 2025
अधिकार्यांची आर्मी पॅरालिम्पिक नोडला भेट
24 Jul 2025
लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाचा दणका
19 Jul 2025
निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला दगड
20 Jul 2025
विधानसभेची मालकी १४ कोटी जनतेची
19 Jul 2025
जुन्या वाहनांवर बंदीचा निर्णय हरित लवादाचा
24 Jul 2025
रावेतमधील जाधव वस्तीतील एसआरए प्रकल्पाची चौकशी करा
20 Jul 2025
अधिकार्यांची आर्मी पॅरालिम्पिक नोडला भेट
24 Jul 2025
लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाचा दणका
19 Jul 2025
निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला दगड
20 Jul 2025
विधानसभेची मालकी १४ कोटी जनतेची
19 Jul 2025
जुन्या वाहनांवर बंदीचा निर्णय हरित लवादाचा
24 Jul 2025
रावेतमधील जाधव वस्तीतील एसआरए प्रकल्पाची चौकशी करा
20 Jul 2025
अधिकार्यांची आर्मी पॅरालिम्पिक नोडला भेट
24 Jul 2025
लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाचा दणका
19 Jul 2025
निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला दगड
20 Jul 2025
विधानसभेची मालकी १४ कोटी जनतेची
19 Jul 2025
जुन्या वाहनांवर बंदीचा निर्णय हरित लवादाचा
24 Jul 2025
रावेतमधील जाधव वस्तीतील एसआरए प्रकल्पाची चौकशी करा
20 Jul 2025
अधिकार्यांची आर्मी पॅरालिम्पिक नोडला भेट
24 Jul 2025
लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाचा दणका
19 Jul 2025
निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला दगड
20 Jul 2025
विधानसभेची मालकी १४ कोटी जनतेची
19 Jul 2025
जुन्या वाहनांवर बंदीचा निर्णय हरित लवादाचा
24 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)