धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस   

पाणी कपातीचे संकट टळले; धरणांतील पाण्याची पातळी वाढली

पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीतील चारही धरण क्षेत्रात मागील चार दिसांपासून पावसाचे सातत्य कायम आहे. मागील तीन दिवसांत धरणात सुमारे २ टीएमसीपेक्षा अधिक पाणी साठले आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळले आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणशंतील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. धरण क्षेत्रात पुढील चार दिवस पावसाचे सातत्य कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून बुधवारी वर्तविण्यात आला. 
 
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून पुण्याला पाणी पुरवठश केला जातो. सद्य:स्थिती चार धरणांत सुमारे ७ टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. याच काळात मागील वर्षी चार धरणांत ३.६६ टीएमसी पाणी उपलब्ध होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांत सुमारे ४ टीएमसी पाणी अधिक आहे. यंदा पावसाला लवकर सुरूवात झाली आहे. त्यामुळे धरणांतील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात २४ तासात ४०० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला होता. 
 
चार धरणांची पाणी साठवणूकीची क्षमता सुमारे २९ टीएमसी आहे. पुण्याला दर महिन्याला एक ते सव्वा टीएमसी पाणी लागते. त्यामुळे सुमारे १३ टीएमसी पाणी पुण्यासाठी राखीव असते. तर उर्वरित पाणी नियोजित वेळापत्रकानुसार  शेतीसाठी सोडले जाते. काही पाण्याचे बाष्पीभवन होते. मात्र गेल्या काही वर्षात लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: उन्हाळ्यात शहरातील स्थिर लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नियोजित पाण्यापेक्षा अधिकचे पाणी शहरासाठी वापरावे लागते. मात्र यंदा हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊसकाळ चांगला असणार आहे.जूनप्रमाणेच जुलै महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जुलैच्या अखेरपर्यंत धरणे भरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
धरण क्षेत्रात २४ तासात पडलेला पाऊस
 
धरण                         पाऊस                 टीएमसी टक्केवारी 
खडकवासला ६ मिमी १.२४           ६२.९२
पानशेत                   ६२ मिमी २.०            १८.७९
वरसगाव                 ५९ मिमी ३.४९           २७.२३
टेमघर                    ६३ मिमी ०.२४            ६.३५
एकूण                   १८४ मिमी ६.९७           २३.९१
मागील वर्षी                                             ३.६६           १२.५७

Related Articles