E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नोव्हाक जोकोविच, दयाना यास्ट्रेम्स्का यांचे विजय
Wrutuja pandharpure
03 Jul 2025
लंडन
: अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत युवा टेनिसपटू अलेक्झांडर मुलर याचा 6-1,6-7,7-9,6-2,6-2 असा पराभव केला. मात्र हा विजय मिळविताना जोकोव्हिच याला प्रचंड मोठी झुंज द्यावी लागली. हा विजय मिळविताना जोकोव्हिचची चांगलीच दमछाक झाली. तर महिलांमध्ये अनुभवी महिला टेनिसपटू कोको गॉफ हिला दयाना ओलेक्सांद्रिव्हना यास्ट्रेम्स्का या युक्रेनच्या युवा महिला टेनिसपटूकडून पराभूत व्हावे लागले. दयाना हिने कोको गॉफला 7-6,7-3,6-1 असे नमविले. कोको गॉफ हिला सरळ सेटमध्ये पराभूत केल्यावर दयाना हिचा आनंद गगनात मावेना.
जोकोव्हिचला विक्रमी 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याचे त्याने म्हटले आहे. जोकोविच आता 38 वर्षांचा आहे आणि विम्बल्डनच्या आधी त्याला हाच प्रश्न विचारण्यात आला की, तुझी ही अखेरची स्पर्धा असेल का? 24 वेळा ग्रँडस्लॅम विजेत्यानेही उत्तर आधीच ठरवलेले होते. जोकोविच म्हणाला की, ही माझी शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असेल का? मी याबद्दल आताच काहीही निश्चितपणे सांगू शकत नाही. पुढच्या वर्षी मी फ्रेंच ओपन किंवा इतर कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत भाग घेईन की नाही, याची मला खात्री नाही. माझी इच्छा पुढील अनेक वर्षे खेळण्याची आहे.
विम्बल्डनमध्ये सातवेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच म्हणाला की, विम्बल्डनमध्ये पुन्हा विजेता होण्याची ही माझी सर्वोत्तम संधी असू शकते, यावर मी सहमत आहे. ते परिस्थितीवर अवलंबून असेल पण सध्या मला खूप चांगले वाटत आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त राहण्याची माझी इच्छा आहे. हे माझे ध्येय आहे; आयुष्याच्या या टप्प्यावर पुढे काय होईल, हे तुम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. जोकोविचने कबूल केले की, ऑल इंग्लंड क्लब त्याला आणखी एक ग्रँडस्लॅम एकेरी जेतेपद जिंकण्याची सर्वोत्तम संधी देऊ शकतो. ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीतील एकूण 25 जेतेपदे होतील. हा असा आकडा आहे जो कोणत्याही खेळाडूला आलेला नाही. जोकोविच आणि अल्काराझसमोर विम्बल्डनमध्ये जगातील अव्वक क्रमांकाचा खेळाडू यानिक सिन्नरचे कडवे आव्हान असेल. उपांत्य फेरीत जोकोविचला कदाचित सिन्नरचा सामना करावा लागू शकतो तर अंतिम फेरीत अल्काराझचे आव्हान असू शकेल. विम्बल्डनमध्येही अल्काराझ-सिन्नर यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते.
विम्बल्डनमध्ये सातवेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच म्हणाला की, विम्बल्डनमध्ये पुन्हा विजेता होण्याची ही माझी सर्वोत्तम संधी असू शकते, यावर मी सहमत आहे. ते परिस्थितीवर अवलंबून असेल; पण सध्या मला खूप चांगले वाटत आहे. स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझ सोमवारी विम्बल्डनमध्ये सेंटर कोर्टवर पहिल्या फेरीत फॅबियो फोगनिनीचा सामना करेल. त्याची नजर सलग तिसर्या विम्बल्डन ग्रँडस्लॅमवर असेल. 1968 मध्ये सुरू झालेल्या ओपन युगात फक्त चार खेळाडूंनी सलग तीन वेळा विम्बल्डन ट्रॉफी जिंकली आहे. त्यात ब्योर्न बोर्ग, पीट सॅम्प्रस, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांचा समावेश आहे.
सहा वर्षांपूर्वी 22 वर्षीय अल्काराझने येथे ग्रास कोर्टवर पहिला सामना खेळला होता. फक्त मागील वर्षीच्या पुरुष विजेत्याला सेंटर कोर्टवर पहिला सामना खेळण्याची संधी मिळते. अल्काराझचा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये 5-0 असा विक्रम आहे, ज्यामध्ये दोन फ्रेंच ओपन जेतेपदांचा समावेश आहे. अमेरिकन ओपनमध्येही अल्काराझ एकदा विजेता ठरला आहे. अल्काराझने तीन आठवडे आधी फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत जगातील अव्वल खेळाडू यानिक सिन्नरला दोन सेटच्या पिछाडीवरून पराभूत करताना विजेतेपद पटकावले होते.
Related
Articles
महिलांच्या बोगीत प्रवेश २ हजार ३२० पुरुषांना दंड
21 Jul 2025
डॉ. टिळक यांच्यामुळे ‘केसरी’ला आधुनिक चेहरा
23 Jul 2025
प्रकल्पग्रस्तांचे होणार गावातच पुनर्वसन
22 Jul 2025
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यास सुरुवात
21 Jul 2025
जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करू नका
19 Jul 2025
महिलांच्या बोगीत प्रवेश २ हजार ३२० पुरुषांना दंड
21 Jul 2025
डॉ. टिळक यांच्यामुळे ‘केसरी’ला आधुनिक चेहरा
23 Jul 2025
प्रकल्पग्रस्तांचे होणार गावातच पुनर्वसन
22 Jul 2025
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यास सुरुवात
21 Jul 2025
जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करू नका
19 Jul 2025
महिलांच्या बोगीत प्रवेश २ हजार ३२० पुरुषांना दंड
21 Jul 2025
डॉ. टिळक यांच्यामुळे ‘केसरी’ला आधुनिक चेहरा
23 Jul 2025
प्रकल्पग्रस्तांचे होणार गावातच पुनर्वसन
22 Jul 2025
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यास सुरुवात
21 Jul 2025
जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करू नका
19 Jul 2025
महिलांच्या बोगीत प्रवेश २ हजार ३२० पुरुषांना दंड
21 Jul 2025
डॉ. टिळक यांच्यामुळे ‘केसरी’ला आधुनिक चेहरा
23 Jul 2025
प्रकल्पग्रस्तांचे होणार गावातच पुनर्वसन
22 Jul 2025
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यास सुरुवात
21 Jul 2025
जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करू नका
19 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)