डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली   

अहमदाबाद विमान दुर्घटना

अहमदाबाद : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील १९० जणांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटविण्यात यश आले. ३२ परदेशी नागरिकांसह १५९ जणांचे मृतदेह नातेवाईकांकडे सोपविले आहेत.लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक १७१ गेल्या आठवड्यात १२ जून रोजी कोसळले होते. त्यात विमानातील २४१ जण आणि वैद्यकीय महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यासह २९ जण असे २७० जणांचा मृत्यू झाला होता. मृतदेह ओळखण्यापलिकडे गेल्याने डीएनए     चाचणीद्वारे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. कालपर्यंत १९० जणांच्या डीएनएच नमुने जुळले असून १५९ मृतदेह नातेवाईकांना सोपविले आहेत. त्यात १२७ भारतीय, पोर्तुगालचे चार, ब्रिटनचे २७ आणि कॅनडातील एकाच्या मतदेहाचा समावेश आहे. भारतीयांपैकी चार जण वैद्यकीय महाविद्यालयाचे असून १२३ जण विमानातील होते, अशी माहिती अहमदाबाद रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी दिली. 

विमानतळावरील कर्मचार्‍यांची चौकशी सुरू

अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास सुरू झाला आहे. विमानतळावरील कर्मचार्‍यांची चौकशी करण्यास प्रारंभ झाला आहे.  त्या अंतर्गत कर्मचार्‍यांचे मोबाइल जप्त केले आहेत. 
विमान उतरणे आणि त्याचे उड्डाण, देखभाल करण्यासाठी नेमलेले कर्मचारी यांची चौकशी सुरक्षा संस्थेने आता सुरू केली. अपघातापूर्वी विमानाची तपासणी केलेल्या कर्मचार्‍यांचा त्यात समावेश आहे. त्यांनीच तपासणीनंतर विमान सुस्थितीत असल्याचा निर्वाळ देत उड्डाणाला परवानगी दिली होती. विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही देखील तपाणीसाठी ताब्यात घेतले आहेत. अपघातास कारणीभूत ठरणार्‍या सर्व बाबींचा विचार करुन तपास केला जात आहे.  विमान कोसळण्यामागे  घातपात होता का ? या दिशेने देखील तपास केला जात आहे. 
 

Related Articles