संंसदेची सुरक्षा भेदणार्‍या दोघांना जामीन   

नवी दिल्ली : संसदेची सुरक्षा भेदणार्‍या दोघांना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. नीलम आझाद आणि महेश कुमावत, अशी त्यांची नावे आहेत. दोन वर्षांपूर्वी संसदेची सुरक्षा भेदत त्यांनी घुसखोरी केली होती. या प्रकरणी न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद आणि हरिष विद्यानाथन शंकर यांनी दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जाममुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच पत्रकारांना मुलाखती किंवा समाज माध्यमांवर कोणत्याही पोस्ट टाकू नयेत, असे आदेशही दिले. सत्र न्यायाालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्यामुळे त्यांची उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

Related Articles