राज्यात कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण   

मुंबई : राज्यात बुधवारी ६१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २,१६९ वर पोहोचली, असे आरोग्य विभागाने सांगितले.काल मुंबईत १९, ठाणे महानगरपालिका हद्दीत तीन, नवी मुंबईत दोन, मीरा भाईंदरमध्ये एक, पनवेलमध्ये दोन, पुणे जिल्ह्यात एक, पुणे शहरात ११, पिंपरी-चिंचवडमध्ये पाच, सातारा जिल्ह्यात एक, सांगली जिल्ह्यात एक, सांगली शहरात तीन, छत्रपती संभाजीनगर शहरात दोन, नागपूर जिल्ह्यात एक, नागपूर शहरात सात आणि वर्ध्यात दोन रुग्ण आढळले आहेत. राज्यात जानेवारीपासून कोव्हिड-१९ च्या २३,२४१ चाचण्या करण्यात आल्या. जानेवारीपासून मुंबईत ८९९ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी, मे महिन्यात ४३५ आणि जूनमध्ये ४५८ रुग्ण आढळून आले. जानेवारीपासून ३१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला

Related Articles