हर्षित राणाच्या निवडीवर वाद   

हेडिंग्ले  : लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू होणार्‍या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने अचानक वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात समाविष्ट केले आहे. काही वेगवान गोलंदाजांच्या तंदुरुस्तीबद्दल चिंता असल्यामुळे हर्षितला संधी मिळाली आहे. तो जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यासारख्या वेगवान गोलंदाजांसह संघात सामील होईल.
 
२३ वर्षीय हर्षित उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरही संधी मिळाली. आयपीएल २०२५ दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा हा वेगवान गोलंदाज १३ सामन्यांमध्ये १५ विकेट घेतल्या. सातत्यपूर्ण अचूकता आणि नियंत्रणासह गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आता इंग्लंडमध्ये संधी मिळाल्यास चांगली कामगिरी करेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची यापूर्वी निवड झाली नव्हती. आता असे मानले जात होते की, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार्‍या अंशुल कंबोजला संधी मिळेल, पण तसे झाले नाही.
 
भारताचा माजी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश यांनी अंशुलऐवजी हर्षितची निवड केल्याबद्दल बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करून आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, अंशुल कंबोजला संधी द्यायला हवी होती. हर्षित राणावर एवढं भर देण्याचं कारणच समजत नाही. इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत ’अ’ संघाच्या अनधिकृत कसोटी सामन्यात हर्षित राणाने फक्त १ विकेट घेतला. त्याने बॅटने १६ धावा केल्या. दुसरीकडे, अंशुल कंबोजने दोन सामने खेळले आणि ५ विकेट घेतल्या तसेच एकूण ७६ धावा केल्या.
 
हर्षित राणाची निवड जाहीर होताच सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, हर्षित राणा ही निवड काहींना योग्य वाटली असली तरी माजी क्रिकेटर अंशुल कंबोजच्या नावावरुन वादाचा भडका उडालाय. या सगळ्यात नाव घेतलं जातंय गौतम गंभीरचं. अनेकांचा आरोप आहे की, हर्षित राणा हा गौतम गंभीरचा लाडका असल्यामुळे त्याला संधी मिळाली.
 
बीसीसीआयने अद्याप कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्याबद्दल सांगितले नाही. पण, असे मानले जाते की आकाश दीप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन्ही अनधिकृत चार दिवसीय सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. दुखापतीमुळे तो यावर्षी आयपीएलमध्येही जास्त खेळू शकला नाही. आकाशने भारत विरुद्ध भारत ’अ’ संघातील अंतर्गत सामन्यात भाग घेतला असला तरी, त्याच्या पूर्ण तंदुरुस्तीबद्दल अजूनही प्रश्न आहेत. जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीसाठी त्याची उपलब्धता आणि तंदुरुस्तीची पुष्टी केली आहे

Related Articles