E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
शिवसेना नेते वसंत मोरे यांच्यावर गुन्हा
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
पुणे
: महापालिका आयुक्तांसह अधिकारी आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या कात्रज चौक ते कात्रज-कोंढवा रस्ता पाहणी दौर्या दरम्यान, आपल्याला विश्वासात न घेतल्याच्या कारणावरून शनिवारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलन केले. शिवसेना नेते वसंत मोरे यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसंत मोेरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
आंदोलना दरम्यान वसंत मोरे व त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांनी घोषणा दिल्या. कात्रज चौकातील संजय गुगळे यांची ३९ गुंठे जागा पालिकेने ताब्यात घेऊन मोबदला म्हणून २१ कोटी दिले. मात्र प्रत्यक्षात जागेवर ३९ गुंठे क्षेत्र भरत नसून पन्नास वर्षांपूर्वी ताब्यात आलेल्या पंपिंग स्टेशन व राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची जागेचे पैसे दिले का? पालिकेने पैसे दिलेली जागा मोजून दाखवावी. या सर्व प्रकारची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच, १९७२ मध्ये कात्रज गावठाण लगतचा दुष्काळात तयार झालेला आणि उपयुक्त रस्ता निवासी झोन होतो कसा? गावाचा रस्ता बंद करण्याची दिवा स्वप्न पाहू नका, असा इशारा शिवसेना नेते वसंत मोरे यांनी दिला होता. तसेच, यावेळी, उपस्थित अधिकार्यांना याचा जाब विचारण्यात आला होता. त्यानंतर वसंत मोरे यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त व आमदार योगेश टिळेकर यांच्या दौर्याला आमचा विरोध नव्हता. मात्र, स्थानिक लोक प्रतिनिधी म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांना यांनी का डावलले? पंधरा वर्षापासून आम्ही कात्रज व परिसरात काम करत आहोत. कात्रजमध्ये यांचे काय योगदान आहे हे यांनी दाखवून द्यावे. अनेक वर्षापासून कात्रज कोंढवा रोड रखडला आहे. त्याचे अपयश झाकण्यासाठी हे या गोष्टी करत आहेत का? एवढे वर्ष तुम्हाला कात्रज कोंढवा रोड दिसला नाही का? आम्ही आंदोलने करायची का नाहीत? असे काय आंदोलन केले होते की गुन्हा दाखल करण्यात आला, असा प्रश्न शिवसेना उबाठाचे नेते वसंत मोरे यांनी यावेळी उपस्थित केला.
Related
Articles
करुण नायरला भारतीय संघात संधी
23 Jul 2025
तिसर्या टप्प्यातील कर्करोगावर महिलेची मात
24 Jul 2025
ज्येष्ठ व्यक्तीला चोरट्यांनी लुटले
24 Jul 2025
प्रकल्पग्रस्तांचे होणार गावातच पुनर्वसन
22 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
’पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला प्रतिसाद
20 Jul 2025
करुण नायरला भारतीय संघात संधी
23 Jul 2025
तिसर्या टप्प्यातील कर्करोगावर महिलेची मात
24 Jul 2025
ज्येष्ठ व्यक्तीला चोरट्यांनी लुटले
24 Jul 2025
प्रकल्पग्रस्तांचे होणार गावातच पुनर्वसन
22 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
’पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला प्रतिसाद
20 Jul 2025
करुण नायरला भारतीय संघात संधी
23 Jul 2025
तिसर्या टप्प्यातील कर्करोगावर महिलेची मात
24 Jul 2025
ज्येष्ठ व्यक्तीला चोरट्यांनी लुटले
24 Jul 2025
प्रकल्पग्रस्तांचे होणार गावातच पुनर्वसन
22 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
’पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला प्रतिसाद
20 Jul 2025
करुण नायरला भारतीय संघात संधी
23 Jul 2025
तिसर्या टप्प्यातील कर्करोगावर महिलेची मात
24 Jul 2025
ज्येष्ठ व्यक्तीला चोरट्यांनी लुटले
24 Jul 2025
प्रकल्पग्रस्तांचे होणार गावातच पुनर्वसन
22 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
’पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला प्रतिसाद
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)