चांदणी चौक जलवाहिनी गळती; आज उशिराने पाणीपुरवठा   

पुणे : वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक टाकीकडे जाणार्‍या मुख्य जलवाहिनीत गळती झाल्याने महापालिकेकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे चांदणी चौक झोनमधील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. आज (मंगळवारी) या भागांमध्ये सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी योग्य ती पूर्वतयारी करून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
 
पाणीपुरवठा बंद असणारे भाग
 
चांदणी चौक टाकी परिसर, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल व मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, सारथी शिल्प, पूजा पार्क, शांतीबन, डुक्करखिंडी परिसर, शास्त्रीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण.

Related Articles