E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देहूनगरी टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली
Samruddhi Dhayagude
18 Jun 2025
तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
प्रस्थान सोहळ्याला सुरुवात
देहू : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आजपासून देहूमध्ये सुरु होत आहे. यासाठी राज्यभरातून वारकरी देहू नगरीत दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच वारकऱ्यांनी मंदिरामध्ये गर्दी केली आहे. दुपारी २ वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. सायंकाळी ५ च्या सुमारास तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले.
देहूमध्ये उत्साहाचे वातावरण
या सोहळ्यात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसडीआरएफ टीम आहे. यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. देहू नगरी टाळ-मृदंगाच्या निनादाने दुमदुमून गेली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाल्याने देहूमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दर्शनासाठी गर्दी
पहाटेपासूनच वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. राज्यभरातून बरेच भाविक देहूमध्ये दाखल झाले आहेत. दुपारच्या सुमारास पालखी सोहळ्याला सुरुवात होईल.
एस डी आर एफ टीम तैनात
इंद्रायणी नदीच्या घाटावर भाविक स्नान करण्यासाठी येतात. त्यावेळी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, तात्काळ मदत मिळावी यासाठी एस डी आर एफ टीम तैनात करण्यात आली आहे. ही टीम इंद्रायणी घाटावर लक्ष ठेवणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
पालखी प्रस्थान सोहळ्याला बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली.
दिलीप महाराज मोरे काय म्हणाले?
दिलीप महाराज मोरे म्हणाले, "यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे."
मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आठ कॅमेरे
पालखीच्या चांदीच्या रथाला पॉलिश करून तो चकाचक करण्यात आला. रथावर आठ कॅमेरे लावले आहेत. ज्यामुळे रथाच्या आसपास काय चालले आहे, हे पाहता येईल. सुरक्षेसाठी मंदिरामध्ये ४२ कॅमेरे लावले आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आठ कॅमेरे लावले आहेत. मंदिराच्या कळसाला फुलांची सुंदर सजावट केली आहे. प्रस्थानापूर्वी भजनी मंडपात देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी अडीच वाजता महाराजांच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर पालखी प्रस्थानाला सुरुवात होईल.
पालखीचा मार्ग कसा असेल?
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग कसा असेल? संत तुकाराम महाराजांची पालखी आज १८ जून रोजी देहूतून प्रस्थान करणार आहे. ही पालखी विविध गावांमधून मार्गक्रमण करत ५ जुलै रोजी पंढरपूरला पोहोचेल. पालखी मार्गामध्ये आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, बारामती, इंदापूर, अकलूज आणि वाखरी यांसारख्या प्रमुख गावांचा समावेश आहे. देहूतून निघाल्यानंतर १९ जूनला पालखी आकुर्डीला जाईल. २० जूनला ती पुण्यात नाना पेठ येथे पोहोचेल. २१ जूनला निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम असेल. त्यानंतर २२ जूनला लोणी काळभोर आणि २३ जूनला यवत येथे पालखी विसावा घेईल.
वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी
पालखीचा पुढील प्रवास २४ जूनला वरवंड, २५ जूनला उंडवडी गवळ्याची, २६ जूनला बारामती, २७ जूनला सणसर, २८ जूनला निमगाव केतकी, २९ जूनला इंदापूर, ३० जूनला सराटी, १ जुलैला अकलूज, २ जुलैला बोरगाव श्रीपूर, ३ जुलैला पिराची करौली आणि ४ जुलैला वाखरी मार्गे होईल. ५ जुलैला पालखी पंढरपूरला पोहोचेल. वारकरी मोठ्या उत्साहाने या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
अजित पवार यांनी दर्शन घेत केली पूजा
देहू येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिरात जाऊन तुकोबांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेत पूजा केली.
Related
Articles
हिंजवडीसह सात गावांच्या समाविष्टचे भिजत घोंगडे
30 Jun 2025
जगन्नाथ रथयात्रेत चेेंगराचेंगरी;तिघांचा मृत्यू; ५० जखमी
30 Jun 2025
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित
02 Jul 2025
ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार
02 Jul 2025
उन्हाळी हंगामातील विशेष रेल्वेंचा कालावधी वाढवला
27 Jun 2025
‘शांघाय’च्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार
27 Jun 2025
हिंजवडीसह सात गावांच्या समाविष्टचे भिजत घोंगडे
30 Jun 2025
जगन्नाथ रथयात्रेत चेेंगराचेंगरी;तिघांचा मृत्यू; ५० जखमी
30 Jun 2025
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित
02 Jul 2025
ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार
02 Jul 2025
उन्हाळी हंगामातील विशेष रेल्वेंचा कालावधी वाढवला
27 Jun 2025
‘शांघाय’च्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार
27 Jun 2025
हिंजवडीसह सात गावांच्या समाविष्टचे भिजत घोंगडे
30 Jun 2025
जगन्नाथ रथयात्रेत चेेंगराचेंगरी;तिघांचा मृत्यू; ५० जखमी
30 Jun 2025
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित
02 Jul 2025
ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार
02 Jul 2025
उन्हाळी हंगामातील विशेष रेल्वेंचा कालावधी वाढवला
27 Jun 2025
‘शांघाय’च्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार
27 Jun 2025
हिंजवडीसह सात गावांच्या समाविष्टचे भिजत घोंगडे
30 Jun 2025
जगन्नाथ रथयात्रेत चेेंगराचेंगरी;तिघांचा मृत्यू; ५० जखमी
30 Jun 2025
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित
02 Jul 2025
ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार
02 Jul 2025
उन्हाळी हंगामातील विशेष रेल्वेंचा कालावधी वाढवला
27 Jun 2025
‘शांघाय’च्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार
27 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप