ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार   

केओंझर : ओडिशातील केझोंहर जिल्ह्यातील एका बेकायदा खाणीचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झाला. काही जण मॅॅगनिज खनिजाचे उत्खनन करत असताना दुर्घटना घडली. 
 
बिचाकुंडी डालपहारजवळ मँगनिजची खाण आहे. तेथे मंगळवारी बेकायदा उत्खनन सुरू होते.  पोलिस उप महासंचालक ब्रिजेश कुमार राय यांनी दुर्घटनेला पुष्टी दिली असून एकाचा मृतदेह मध्यरात्री २ वाजता मिळाल्याचे सांगितले. अन्य दोन मृतदेह टाटा हॉस्पिटलमध्ये हलविल्याचे ते म्हणाले. खाणीच्या एका भाग कमकुवत झाला होता. त्यामुळे अंगावर मातीचे ढिगारे कोसळून त्याखाली तिघे अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles