E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जिल्ह्यातील जुने पूल, इमारती, वाडे यांची तपासणी करणार : डुडी
Wrutuja pandharpure
18 Jun 2025
पुणे
: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेली दुर्घटना आणि त्यात झालेले ४ पर्यटकांचा मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे.दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील धोकादायक, अतिधोकादायक, जुने पूल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलके, रेल्वे पुलाचे येत्या सात दिवसात बांधकाम तपासणी (स्टॅ्रक्चरल ऑडिट) करून त्याचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मंगळवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाज बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप गिल्ल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकरी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यातील धोकदायक ठिकाणांची पाहणी करुन जागा निश्चिती करावी. त्याची विविध माध्यमांद्वारे व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. पावसाळ्यात धोकादायक नसलेल्या तथापि, पाणी साचणार्या रस्त्यावर बॅरिकेट करावे. पर्यटकांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने त्यांना धोकादायक पयर्टनस्थळी जाण्यास प्रतिबंधित करावे तसेच पर्यटनस्थळी व रस्त्यावर दिशादर्शक फलके लावावीत, याठिकाणी वन व्यवस्थापन समितीची मदत घ्यावी, आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त कर्मचार्यांची नियुक्ती करावी. धोकादायक ठिकाणी मॉकड्रील आयोजित करावे. तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवावेत.
मान्सून काळात संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेता पूरबाधित गावांची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नदी पात्रातील पूररेषेखाली येणार्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. आपदा मित्रांना आवश्यतेप्रमाणे पायाभूत सूविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची कार्यशाळा आयोजित करावी.या बैठकीस सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, आरोग्य, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, शहर आयुक्तालय, जिल्हा अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महावितरण, वनविभाग, वन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, भारतीय हवामान विभागासह सर्व संबंधित विभागांचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.
Related
Articles
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा
30 Jun 2025
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधक आक्रमक
03 Jul 2025
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
01 Jul 2025
इराणमध्ये लष्करी अधिकारी अणु शास्त्रज्ञांवर अंत्यसंस्कार
28 Jun 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा
30 Jun 2025
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधक आक्रमक
03 Jul 2025
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
01 Jul 2025
इराणमध्ये लष्करी अधिकारी अणु शास्त्रज्ञांवर अंत्यसंस्कार
28 Jun 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा
30 Jun 2025
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधक आक्रमक
03 Jul 2025
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
01 Jul 2025
इराणमध्ये लष्करी अधिकारी अणु शास्त्रज्ञांवर अंत्यसंस्कार
28 Jun 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा
30 Jun 2025
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधक आक्रमक
03 Jul 2025
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
01 Jul 2025
इराणमध्ये लष्करी अधिकारी अणु शास्त्रज्ञांवर अंत्यसंस्कार
28 Jun 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया