कौटुंबिक न्यायालयात ’ई-फायलिंग सेंटर’   

पुणे  : कौटुंबिक न्यायालयात दि पुणे लॉयर्स कंझ्युमर सोसायटीचे ’ई-फायलिंग सेंटर’ सुरू झाले आहे. या सेंटरचे उद्घाटन कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम रूक्मे व पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंझाड आणि फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या हस्ते झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार ई-फायलिंग बंधनकारक करण्यात आले आहे. 
 
कंझ्युमर सोसायटी शिवाजीनगर न्यायालयात 2023 पासून ही सेवा देण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर कौटुबीक न्यायालयात हे केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती. या केंद्रातून वकील, पक्षकारांना अल्पदरात सेवा देण्यात येणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंझ्युमर सोसायटीच्या अध्यक्षा रेखा करंडे आणि सर्व संचालक मंडळाने केले आहे. यावेळी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, वकील सुभाष पवार, संतोष खामकर, विकास ढगे, एन. डी. पाटील, एकनाथ सुगावकर, विजयसिंह निकम, राम भुजबळ, राणी कांबळे, फैयाज शेख आदी उपस्थित होते. 

Related Articles