डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स   

बंगळुरु : कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे धाकटे बंधू आणि काँग्रेस नेते डी.के. सुरेश यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी एका आर्थिक अफरातफरशी संबंधित कथित फसवणूक प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.माजी खासदार सुरेश यांना १९ जून ईडीसमोर हजर राहावे लागणार असून आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

Related Articles