आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्‍यांना मोफत भोजन   

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या पाच हजार २०० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बस घेऊन येणारे चालक, वाहक, बसगाड्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी, सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांना चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
 
ते म्हणाले, एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने भक्तांची सेवा करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अतिशय निष्ठेने ते कर्तव्य बजावत आहेत. वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये, म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग तीन दिवस या सर्वांसाठी उपवासाच्या पदार्थांची व्यवस्था करणार आहे. 

Related Articles