उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर दरड कोसळली   

दोन बांधकाम मजूर ठार; सात बेपत्ता

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात रविवारी पहाटे ढगफुटीनंतर दरड कोसळून दोन बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला तर सात  बेपत्ता झाले. यमनोत्री राष्ट्रीय महामार्गाजवळ झोपड्या बांधून बांधकाम मजूर राहात होत. तेथे ही दुर्घटना घडली.
 
महमार्गावजवळील परिसरात एका हॉटलचे बांधकाम सुरू आहे. बेपत्ता मजूर नेपाळचे आहेत. जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्या यांनी सांगितले की, उत्तरकाशीच्या पालीगडच्या पुढे सुमारे ४ किलोमीटवरील सिलाई वळणावर दरड कोसळली होती. परिसर आता दरडप्रवण क्षेत्र झाला आहे. त्यामुळे हॉटेलचे बांधकाम बंद करावे लागणार आहे. दरम्यान, एकूण १९ मजूर हॉटेलखाली झोपड्या बांधून राहात होते. तेथे दरड कोसळल्यामुळे महामार्गाचा सुमारे दहा मीटरचा भाग नष्ट झाला. जिल्हा आपत्ती कृती केंद्राने सांगितले की, दहा मजुरांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. दरम्यान, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकांतील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य वेगाने सुरू केले आहे. महामागार्ंवर अन्य दोन ठिकाणी दरड कोसळल्याने तेथील मार्ग बंद झाला. यमनोत्रीचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांनी तेथून हलू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. 

चारधाम यात्रा स्थगित

ढगफुटी आणि दरड कोसळण्याच्या घटनेनंतर अनूचित प्रकार घडल्यानंतर अनर्थ निर्माण होऊ नये, यासाठी चारधाम यात्रा एक दिवसासाठी स्थगित केली आहे. हवामान विभागाने ३० जूनपर्यंत रेड अलर्टचा इशारा दिला. त्यामध्ये डेहराडून, टेहरी, पौडी, हरिद्वार, नैनिताल चंपावत आणि उधम सिंग नगरचा समावेश आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी चारधाम यात्रा स्थगित केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यात्रेकरुंनी आहे त्या ठिकाणी राहावे. हवामानाची परिस्थिती पाहून यात्रा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय आज (सोमवारी) घेतला जाणार आहे. यात्रेकरुंनी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. हवामान पूर्वपदावर येईपर्यत आहे त्या ठिकाणावरुन हलू नये, असे गढवालचे आयुक्तांनी स्पष्ट केले.  
 

Related Articles