पीसीएम ग्रुप निकालात पुण्याचा डंका; चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल   

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या पीसीएम ग्रुपचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता सीईटी सेलकडून पीसीएम ग्रुप मधील प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. त्यामध्ये ४ विद्यार्थी पुण्यातील आहेत. त्यामुळे एकूण निकालात पुण्याचा डंका दिसून आला.
 
सीईटी सेलकडून जाहीर केलेल्या यादीनुसार, सिद्धांत धिरज पाटनकर, अमोल ध्रुव नातू आणि तनय जेतन गाडगिळ चार पुण्यातील विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण २२ विद्यार्थ्यांच्या यादीत पु्ण्यातील ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पीसीएम ग्रुपची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते, असे असताना केवळ २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. या निकालात लातूर पॅटर्न पिछाडीवर दिसून येत आहे. 
 
शैक्षणिक वर्षे २०२५-२६ साठी वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. त्या अनुषंगाने ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी पीसीएम ग्रुपच्या परीक्षेसाठी सीईटी सेलवर नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. त्यानुसार या परीक्षेचा संपूर्ण निकाल हा ९१.४ टक्के लागला आहे. 

Related Articles