श्रमिक पत्रकार संघाच्या खजिनदारपदी ’केसरी’चे दिलीप तायडे, कुलकर्णी कार्यकारिणीवर   

अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील

पुणे : श्रमिक पत्रकार संघाच्या रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत दै. ’केसरी’चे बातमीदार दिलीप तायडे हे खजिनदारपदी तर कार्यकारिणी सदस्यपदी विक्रांत कुलकर्णी हे निवडून आले आहेत. अध्यक्षपदी सकाळचे बातमीदार ब्रिजमोहन पाटील हे निवडून आले आहेत.
 
पुणे श्रमिक पत्रकार संघाची काल रविवारी निवडणूक पार पडली. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. प्रताप परदेशी व सहायक निवडणूक अधिकारी अ‍ॅड. स्वप्निल जोशी यांनी काम पाहिले. या निवडणुकीत उपाध्यक्षपदी-राजा गायकवाड (महाराष्ट्र टाईम्स), सागर आव्हाड (साम टीव्ही), सरचिटणीस-मंगेश फल्ले (दिव्य मराठी), चिटणीस-तनिष्का डोंगरे (सकाळ), निलेश चौधरी (पुण्य नगरी) तर कार्यकारिणी सदस्यपदी लक्ष्मण खोत (भास्कर), राजाराम पवार व दत्ता आढागळे (सामना), अतुल चिंचली (लोकमत), नरेंद्र साठे (सकाळ), आशिष देशमुख (पुढारी), समीर सय्यद (नवभारत), तेजस टवलारकर (महाराष्ट्र टाइम्स) व सज्जाद सय्यद (ई-टीव्ही भारत) यांची निवड झाली आहे.

Related Articles