आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश   

बडगुजर यांच्या प्रवेशाचे समर्थन करताना भाजप नेत्यांची तारांबळ

मुंबई,  (प्रतिनिधी) : नाशिकचे माजी महापौर सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, अशोक मुर्तडक यासह ठाकरे गटाच्या नाशिकच्या चार नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. बडगुजर यांचे दाऊदचा हस्तक सलीम याच्याशी संबंध असल्याचे आरोप भाजपने विधिमंडळात केले होते. पण, त्याच बडगुजर यांना काल स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असतानाही सन्मानाने पक्षात प्रवेश देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पण, आधी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर याचे समर्थन करताना त्यांची बरीच तारांबळ उडाली होती. 
 
बडगुजर यांच्या सीमोलंघनाची कुणकुण लागल्याने उद्धव ठाकरे गटाने आठवडाभरापूर्वीच त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. परंतु, नाशिकच्या भाजप आमदार सीमा हिरे आणि स्थानिक पदाधिकार्‍यांनी बडगुजर यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला होता. बावनकुळे यांनीही काल सकाळी माध्यमांशी बोलताना बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले होते. बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मंत्री महाजन यांनी वरून हलवली व दुपारी माजी मंत्री बबनराव घोलप, नयना घोलप, मुर्तडक यांसोबत बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. प्रदेश कार्यालयातील प्रवेश सोहळा पार पडला.
 

Related Articles