निर्देशांकाची उसळी   

मुंबई : इराण-इस्रायलमधील युद्धबंदीनंतर भू-राजकीय तणाव कमी झाला. त्याचे सकारात्मक चित्र सलग तिसर्‍या दिवशी शेअर बाजारात पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी गुरुवारी एक टक्क्यानी वाढला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल १.२१ टक्के म्हणजे १,०००.३६ अंकांनी वाढून ८३,७५५.८७ वर स्थिरावला. सत्राअंतर्गत तो १.२७ टक्क्यांनी वाढून ८३,८१२.०९ वर पोहोचला होता. दुसरीकडे, एनएसई निफ्टीदेखील १.२१ टक्के म्हणजे ३०४.२५ अंकांनी वाढून २५,५४९ वर पोहोचला. काल टाटा स्टील, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, अदानी पोर्टस, इटरनल, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अ‍ॅक्सिस बँकेचे समभाग वधारले. तर, स्टेट बँक ऑफ इंडिया, टेक महिंद्रा, मारुती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग कोसळले.

Related Articles