आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर   

मुंबई : भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिला आयसीसी रँकिंगमध्ये तिच्या दमदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. स्मृती मानधना पुन्हा एकदा आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये नंबर वन फलंदाज बनली आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच भारतीय फलंदाज अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
 
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिने ताज्या अपडेटमध्ये १९ रेटिंग गुण गमावले आहेत. याचा फायदा भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिला  झाला आहे.मंगळवारी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये स्मृती मानधना हिचे एकूण ७२७ रेटिंग गुण आहेत. तिच्यानंतर इंग्लंडची कर्णधार नताली सायव्हर-ब्रंट ७१९ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.
 
वोल्वार्ड्ट आता ७१९ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. मानधना नंतर या यादीतील पुढील दोन भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर आहेत. जेमिमा १४ व्या आणि हरमनप्रीत कौर १५ व्या स्थानावर आहे.

Related Articles