E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
Samruddhi Dhayagude
17 Jun 2025
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी दुपारी लंडनला झेपावलेले एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरात कोसळून भीषण दुर्घटना घडली. बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर विमान कोसळल्यानंतर आगीच्या ज्वाळा निघाल्या, धुराचे लोट उठले. सर्वत्र आरडाओरड सुरु झाली. ५६ वर्षीय बांधकाम व्यावसायिक राजू पटेल क्षणाचाही विचार न करता घटनास्थळी धावले. आपल्या कर्मचाऱ्यांसह पटेल अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचले. यावेळी ढिगाऱ्याखालून जवळपास ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोख, काही पासपोर्ट आणि भगवद्गीता बाहेर काढल्याचे सांगितले.
काय म्हणाले राजू पटेल?
"सुरुवातीच्या १५ ते २० मिनिटांपर्यंत, आम्हाला जवळ जाताच आले नाही. आग खूप भीषण होती," असं राजू पटेल म्हणाले. "पण पहिली अग्निशमन दल आणि १०८ रुग्णवाहिका येताच आम्ही मदतीसाठी उडी मारली." असे ही ते म्हणाले. स्ट्रेचर दिसत नसल्याने त्यांनी जखमींना नेण्यासाठी साड्या आणि चादरी वापरल्या.
आम्ही शक्य तितकं करण्याचा प्रयत्न केला, असे पटेल म्हणाले. अधिकाऱ्यांनी पटेल यांच्या टीमला रात्री नऊ वाजेपर्यंत घटनास्थळी राहण्याची परवानगी दिली. आपत्कालीन सेवांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवताच, पटेल यांच्या टीमने पुढील काम सुरु केले. अवशेष शोधण्याचे काम. जळालेले सामान सर्वत्र विखुरलेले होते.
काय सापडले ढिगाऱ्याखाली?
ढिगाऱ्यातून त्यांनी ७० तोळे (८०० ग्रॅमपेक्षा जास्त) सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये रोख, काही पासपोर्ट आणि एक भगवद्गीता बाहेर काढली. हे सर्व पोलिसांच्या ताब्यात दिले. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी रविवारी सांगितले की, सर्व वाचलेल्या वैयक्तिक वस्तूंचे दस्तऐवजीकरण केले जात आहे आणि ते जवळच्या नातेवाईकांना परत केले जाईल.
"या कठीण काळात आम्ही काहीतरी करू शकलो याबद्दल मी कृतज्ञ आहे," असे पटेल म्हणाले. त्यांनी २००८ च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटांवेळीही मदत केली होती. "बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी सिव्हिल हॉस्पिटलपासून फक्त १०० मीटर अंतरावर होतो. पण यावेळच्या अपघातातील विनाश... आग... मी हे कधीही विसरणार नाही," असे ते पुढे म्हणाले.
Related
Articles
माउलींचा पालखी सोहळा फलटण नगरीत विसावला
29 Jun 2025
शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक
02 Jul 2025
मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला पुण्यात प्रतिसाद
03 Jul 2025
पुरी रथयात्रेदरम्यान ६०० हून अधिक भाविक आजारी
29 Jun 2025
टाकीत बुडालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना अकरा लाखांची भरपाई
03 Jul 2025
भाजपकडून हिमाचलला सावत्र आईसारखी वागणूक : खर्गे

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
केरळचा आदर्श
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप