E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
Samruddhi Dhayagude
17 Jun 2025
40800000000 रुपयांचे विम्याचे दावे
नवी दिल्ली : भारतात एक दशकाहून अधिक काळातील सर्वात घातक विमान अपघातामुळे विमान वाहतूक विमा उद्योगात धक्का बसला आहे आणि यामुळे देशातील सर्वात महागड्या विम्याचा दावा केला जाऊ शकतो. एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर १२ जून रोजी अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या ३३ सेकंदात कोसळले. विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय विमान निवासी भागात आणि रुग्णालयाच्या वसतिगृहात पडल्याने सुमारे ३० जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये बरेच परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
इतिहासातील सर्वात मोठा विमा दावा
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या दुःखद घटनेनंतर एअर इंडिया आता $475 दशलक्ष (सुमारे 4,080 कोटी रुपये) च्या विमान विम्याचा दावा करायची तयारी करत आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) चे प्रमुख रामास्वामी नारायणन म्हणतात की, “भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विमान विमा दावा असू शकतो.” एअर इंडियाने अद्याप विम्याबद्दल कोणतेही विधान केलेले नाही.
दाव्याचे विश्लेषण
विमानाची किंमत: दाव्यापैकी $ १२५ दशलक्ष (१०७५ कोटी रुपये) विमानाच्या अवशेष आणि इंजिनसाठी आहे.
जीवितहानी : उर्वरित $ ३५० दशलक्ष (३,०१४ कोटी रुपये) प्रवासी आणि जमिनीवर मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या भरपाईसाठी आहे. नारायणन म्हणाले की, विमानाचा दावा लवकरच निकाली काढला जाईल पण, नुकसानभरपाईच्या दाव्यांसाठी वेळ लागू शकतो.
विम्याचा प्रीमियम वाढू शकतो?
ही रक्कम २०२३ मध्ये संपूर्ण भारतीय विमान वाहतूक उद्योगाने भरलेल्या प्रीमियमपेक्षा तिप्पट जास्त आहे. याचा परिणाम म्हणजे की भारतीय विमान कंपन्यांचा विमा प्रीमियम वाढू शकतो. जेव्हा जेव्हा विमान कंपन्या विमा पॉलिसींचे नूतनीकरण करतात तेव्हा किमती वाढू शकतात. परदेशी पीडितांच्या बाबतीत त्यांच्या देशाच्या कायद्यानुसार भरपाई निश्चित केली जाईल, ज्यामुळे दाव्याची रक्कम आणखी वाढू शकते.
या अपघातानंतर सुमारे १५०० कोटी रुपयांचा दावा अपेक्षित असून या दाव्याचा बहुतांश भाग परदेशी विमा कंपन्या भरतील. भारतीय विमा कंपन्या, ज्यामध्ये टाटा AIG आघाडीवर आहे, फक्त १००-१५० कोटी रुपये देतील. उर्वरित जोखीम परदेशी कंपन्यांनी घेतली आहे.
भारतावर कमी, जगावर जास्त परिणाम
GIC सारख्या कंपन्यांनी ९५ टक्के पेक्षा जास्त जोखीम जागतिक पुनर्विमा कंपन्यांना विकली असल्यामुळे भारतीय विमा कंपन्यांवर याचा मोठा भार पडणार नाही. त्यांचा विमान विमा प्रीमियम एकूण प्रीमियमच्या फक्त एक टक्का आहे. या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले असून घटनेपासून तपास सुरू आहे आणि दररोज नवीन माहिती समोर येत आहे. आता काही दिवसांपूर्वीच अपघातग्रस्त विमानाचे विमा संरक्षण वाढवल्यास समोर आले.
Related
Articles
बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अर्थसाहाय्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
04 Jul 2025
तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
30 Jun 2025
सीएनजी, मालमोटारी महागणार
01 Jul 2025
घोडेगावात दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिकांना उलट्या जुलाब
28 Jun 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
पेचात सापडलेला ‘सर्वोच्च’ नेता!
29 Jun 2025
बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अर्थसाहाय्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
04 Jul 2025
तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
30 Jun 2025
सीएनजी, मालमोटारी महागणार
01 Jul 2025
घोडेगावात दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिकांना उलट्या जुलाब
28 Jun 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
पेचात सापडलेला ‘सर्वोच्च’ नेता!
29 Jun 2025
बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अर्थसाहाय्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
04 Jul 2025
तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
30 Jun 2025
सीएनजी, मालमोटारी महागणार
01 Jul 2025
घोडेगावात दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिकांना उलट्या जुलाब
28 Jun 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
पेचात सापडलेला ‘सर्वोच्च’ नेता!
29 Jun 2025
बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अर्थसाहाय्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
04 Jul 2025
तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
30 Jun 2025
सीएनजी, मालमोटारी महागणार
01 Jul 2025
घोडेगावात दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिकांना उलट्या जुलाब
28 Jun 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
पेचात सापडलेला ‘सर्वोच्च’ नेता!
29 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप
6
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले