E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
पेचात सापडलेला ‘सर्वोच्च’ नेता!
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
चर्चेतील चेहरे,राहुल गोखले
इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने घेतलेली उडी; इराणने कतार व सीरिया येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर केलेला क्षेपणास्त्रांचा मारा आणि त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल व इराण यांच्यात युद्धबंदीची केलेली घोषणा या सर्व घडामोडी अतिशय वेगाने घडल्या असल्या तरी हा युद्धबंदी किती काळ टिकेल याची शंका आहेच. याचे कारण इस्रायल आणि काही प्रमाणात अमेरिकेला देखील केवळ इराणच्या अणुकार्यक्रमात खीळ घालण्यात स्वारस्य नसून तेथे सत्तापालट होण्यात जास्त रस आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयतुल्ला खामेनी यांच्यावर हल्ला करण्याचे सूतोवाच केले होतेच; शिवाय त्यांच्यावर हल्ला केल्याने हा संघर्ष चिघळणार नाही तर संपुष्टात येईल अशी मल्लिनाथीही केली होती. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनीही खामेनी यांचे अस्तित्व यापुढे टिकू देणे कठीण आहे असे विधान केले होते. अमेरिकेने इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ला चढविला तेंव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी हा हल्ला इराणमधील सत्तापालटासाठी नाही अशी भूमिका मांडली होती. आपल्याच मंत्र्यांना व सहकार्यांना तोंडघशी पाडण्याची खोड असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हान्स यांना खोटे पाडले आणि इराणमध्ये सत्तापालट होण्याचे संकेत दिले. तूर्तास खामेनी यांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतला आहे; त्यांनी आपले उत्तराधिकारी कोण असेल याची चाचपणी सुरु केली आहे इत्यादी वृत्ते प्रसृत होत आहेत. एक खरे; १९८९ मध्ये इराणचे तत्कालीन सर्वोच्च धार्मिक नेते आयतुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यापासून प्रथमच खामेनी यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असावा.
खामेनी यांचे वय ८६ वर्षांचे आहे. कर्करोगातून ते बरे झाले असले तरी त्यांची प्रकृती फारशी बरी नाही असे म्हटले जाते. अर्थात अशा पदांवरील व्यक्तींच्या प्रकृतीच्या खर्या बातम्या क्वचितच बाहेर येतात. त्यातही इस्रायलशी घनघोर संघर्ष सुरु असताना तर त्याविषयीची माहिती बाहेर येणे दुरापास्त. तीन दशकांहून अधिक काळ इराणची सूत्रे त्यांच्या हातात आहेत. या काळात इराणमध्ये अनेक स्थित्यंतरे घडली. त्यांचे खामेनी केवळ साक्षीदार नव्हते तर बहुतांशी वेळा तेच त्यांना कारणीभूत होते. १९ एप्रिल १९३९ रोजी उत्तर इराणमधील एका गावात जन्मलेले खामेनी यांचे वडील मौलवी होते. खामेनी यांचे लहानपण खडतर होते. एकूण आठ भावंडांपैकी खामेनी एक. गरिबीमुळे अनेकदा खाण्याचीही भ्रांत असे. लहानपणीच खामेनी यांनी कुराण पठणाचे धडे गिरविले. वयाच्या अठराव्या वर्षी ते इराकमधील नजफ या ठिकाणी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी गेले होते. परंतु त्यांच्या वडिलांच्या आग्रहामुळे ते इराणला परतले. १९५८ ते १९६४ या काळात त्यांनी इराणमधील कोम या ठिकाणी धार्मिक शिक्षण घेतले.
त्यावेळी इराणमध्ये शहा पहलवी यांची राजवट होती. ती राजवट अमेरिकेला अनुकूल होती आणि त्यामुळे इराणमध्ये त्याविरोधात चळवळी आकार घेत होत्या. आयतुल्ला खोमेनी या नावाने पुढे ओळखले जाणारे रुहोल्लाह खोमेनी यांच्या नेतृत्वाखालील या बंडखोरांच्या चळवळीत खामेनी सामील झाले. पहलवी राजवटीने खामेनी यांना किमान सहावेळा अटक केली. १९७९ मध्ये इराणमध्ये झालेल्या उठावातील एक प्रमुख नेते म्हणून खामेनी यांची ओळख निर्माण झाली. पहलवी राजवट उलथवून टाकल्यानंतर खोमेनी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते बनले.
धर्मसत्ताक राज्यात सर्वोच्च धार्मिक नेत्यालाच सर्वाधिकार असतात. संसद, न्यायालय या व्यवस्था असल्या तरी त्यांवर नियंत्रण सर्वोच्च नेत्याचेच असते. साहजिकच खोमेनी इराणचे सर्वेसर्वा झाले. खोमेनी यांचा विश्वास खामेनी यांनी संपादन केला. तेहरानमध्ये होणार्या शुक्रवारच्या नमाजाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. ते पद प्रतिष्ठेचे मानले जाई. इराण रेव्होल्यूशनरी गार्ड या संघटनेचे खामेनी १९८१ मध्ये कमांडर झाले. १९८०-९० चे दशक हे खामेनी यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने महत्वाचे ठरले. १९८२ मध्ये ते इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार होते. निवडणूक रिंगणात उतरलेले ते पहिले धार्मिक नेते ठरले. तत्कालीन अध्यक्षांची हत्या १९८१ मध्ये झाल्याने ती निवडणूक होत होती. अकबर हाश्मी रफसंजानी या इराणच्या राजकारणातील बड्या आणि प्रभावशाली नेत्याचे समर्थन खामेनी यांना मिळाले आणि ९५ टक्के मते मिळवत खामेनी विजयी झाले. १९८५ च्याअध्यक्षपदाच्या निवडणुकीत खामेनी पुन्हा निवडून आले; तेही ८७ टक्के मते मिळवत. त्या निवडणुकीत बरेच गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला होता.
१९८९ साली आयतुल्ला खोमेनी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकार्याचा शोध सुरु झाला. त्या पदावर धार्मिक मंडळातील सर्वांत ज्येष्ठ सदस्याची निवड होईल अशी अपेक्षा होती. त्या निकषात खामेनी बसत नव्हते. पण त्यावेळी इराणच्या संसदेचे अध्यक्ष असलेले रफसंजानी यांनी पुन्हा एकदा खामेनी यांच्या पारड्यात वजन टाकले. ’असेम्ब्ली ऑफ एक्सपर्ट्स’-म्हणजे धार्मिक नेत्यांच्या ८८ सदस्यीय मंडळातील अनेकांनी रफसंजानी यांच्या सुरात सूर मिसळला. खामेनी हेच आपले उत्तराधिकारी असावेत अशी इच्छा खोमेनी यांनीच प्रकट केल्याचा दावा रफसंजानी यांनी केला. त्यावरून धार्मिक मंडळातील काहींनी नाराजी व्यक्त केली खरी; पण खामेनी इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेतेपदी निवडून गेलेच.
त्यांनी आपल्या कामाची शैली खोमेनी यांच्याप्रमाणेच ठेवली; पण इराणच्या सामर्थ्यवृद्धीसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. अर्थात त्या योजना त्याच्या दृष्टीने इराणच्या हिताच्या असल्या तरी पश्चिम आशियातील भूराजकीय समीकरणे बदलणार्याही ठरल्या. पाश्चिमात्य स्वरूपाची लोकशाही आणि भांडवलशाही यांचा त्यांना तिटकारा आहे. पाश्चात्य राष्ट्रे ही मुस्लिम द्वेष्टी आहेत असा त्यांचा आक्षेप होता. आयतुल्ला खोमेनी यांनी अमेरिका म्हणजे ’मोठा सैतान’ आणि इस्रायल म्हणजे ‘छोटा सैतान’ असा उपहास केला होता. खामेनी यांनी तोच कित्ता गिरविला. कदाचित त्यातूनच असेल पण रशिया व चीनशी त्यांनी व्यापारसंबंध वृद्धिंगत केले.
मात्र दुसरीकडे खामेनी यांनी इराणच्या छुप्या समर्थनावर पोसल्या गेलेल्या अनेक संघटनांना बळ दिले- मग ती हमास असो; हुती असोत किंवा हिज्बुल्ला असो. सुरुवातीस त्यांनी इराणमधील विचारवंतांशी संवाद साधला; इराण कधीही अण्वस्त्र निर्मिती करणार नाही अशा आणाभाका घेतल्या. पण स्वतःच्याच भूमिकांना त्यांनी लवकरच छेद दिला. दरम्यान त्यांच्यावर अनेक आरोपही होऊ लागले. वरकरणी त्यांची राहणी अगदी साधी असली तरी प्रत्यक्षात त्यांनी प्रचंड माया जमवली असल्याचे रहस्योदघाट्न ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने सहा महिन्यांच्या शोध पत्रकारितेतून केले. ब्रिटनमधील ‘दि टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने देखील खामेनी यांच्यावर आरोप केले होते. खनिज तेलाच्या व्यापारातून इराणला प्रचंड पैसा मिळतो; त्यातील काहीअंशी दलाली खामेनी यांना मिळते; आणि खामेनी कुटुंबाची मालमत्ता अब्जावधी डॉलरची असल्याचा गौप्यस्फोट या दैनिकाने केला होता.२००९ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भयंकर गैरप्रकार घडले; हिंसाचार उसळला. त्यानंतर इराणमधीलच काही धार्मिक नेत्यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या ’ग्रीन चळवळी’ने खामेनी यांच्यावर ते हुकूमशहा असल्याचे शरसंधान करीत त्यांच्या उचलबांगडीची मागणी केली होती. अकरा पानी पत्रातून ते आरोप करण्यात आले होते. सुधारणवाद्यांना खामेनी लक्ष्य करीत असल्याचा; इराण रेव्होल्यूशनरी गार्डचा वापर खासगी कारणांसाठी खामेनी करत असल्याचेही आरोप या नेत्यांनी केले होते. मात्र विरोध निर्घृणपणे मोडून काढणे ही खामेनी यांची कार्यशैली असल्याचा प्रत्यय त्यावेळी तसेच पुढे २०२३ मध्येही आला. खामेनी यांच्या काही भूमिकांमधील विसंगतीही चव्हाट्यावर आली.
खामेनी यांचे वय आणि प्रकृती पाहता तेआपला उत्तराधिकारी ठरवतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांच्या संभाव्य उत्तराधिकार्यांच्या यादीत इराणचे निवृत्त सरन्यायाधीश सादिक लारीजानी यांचेही नाव असले तरी प्रथम क्रमांकावर खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांचेच नाव आहे. घराणेशाहीतून उत्तराधिकारी ठरवली जाण्याच्या पद्धतीची १९९० मध्ये त्यांनी खिल्ली उडविली होती. या विरोधाभासाकडे खामेनी यांनी सोयीस्कर कानाडोळा केला आहे.खामेनी यांना साहित्याची-काव्याची आवड असल्याचे सांगितले जाते. आपल्या भाषणात ते अनेकदा काव्यपंक्ती उद्धृत करीत असत. काव्यवाचना च्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत आणि तेथील कवींशी त्यांच्या कवितांच्या दर्जाबद्दल; उणिवांबद्दल चर्चा करीत. पण त्याच खामेनी यांच्या राजवटीत इराणमधील अनेक लेखक, कवी यांचा गूढ मृत्यू झाला हेही नाकारता येत नाही. जे खामेनी स्वतः कविता रचत ते इतके निष्ठुर कसे असा सवाल उपस्थित होतो तेंव्हा खामेनी कवी असले तरी इराण साहित्यिक वर्तुळाने त्यांना कधीही उच्च दर्जाचे कवी मानले नाही यात त्याचे उत्तर सापडते.आपण ज्यापासून वंचित राहिलो ते ज्यांना लाभले त्यांच्याविषयी असूया, द्वेष यांतून आपल्या शल्याचे शमन करणे अशी ही मानसिकता हुकूमशहांमध्ये प्राधान्याने जाणवते. खामेनी त्यास अपवाद नाहीत. आता त्यांच्या डोक्यावर केवळ सत्ता जाण्याचीच नव्हे तर देशच हातून जाण्याची टांगती तलवार आहे. ज्या राष्ट्रांचा द्वेष करून त्यांनी कारभार केला, त्याच अमेरिका व इस्रायलच्या हातात आता त्यांचे भवितव्य असणार आहे. स्वतःस कवी म्हणवून घेणारे आयतुल्ला खामेनी यांच्यासाठी हा काव्यगत न्यायच आहे यात शंका नाही.
Related
Articles
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे डॉ. टिळक यांना श्रद्धांजली
24 Jul 2025
मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता नाही : मुनगंटीवार
26 Jul 2025
एचडीएफसी बँक: विलीनीकरण, बोनस, लाभांशाची पर्वणी
21 Jul 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ
24 Jul 2025
हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत शनिवारी ’टिमवि’त व्याख्यान
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे डॉ. टिळक यांना श्रद्धांजली
24 Jul 2025
मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता नाही : मुनगंटीवार
26 Jul 2025
एचडीएफसी बँक: विलीनीकरण, बोनस, लाभांशाची पर्वणी
21 Jul 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ
24 Jul 2025
हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत शनिवारी ’टिमवि’त व्याख्यान
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे डॉ. टिळक यांना श्रद्धांजली
24 Jul 2025
मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता नाही : मुनगंटीवार
26 Jul 2025
एचडीएफसी बँक: विलीनीकरण, बोनस, लाभांशाची पर्वणी
21 Jul 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ
24 Jul 2025
हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत शनिवारी ’टिमवि’त व्याख्यान
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे डॉ. टिळक यांना श्रद्धांजली
24 Jul 2025
मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता नाही : मुनगंटीवार
26 Jul 2025
एचडीएफसी बँक: विलीनीकरण, बोनस, लाभांशाची पर्वणी
21 Jul 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ
24 Jul 2025
हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत शनिवारी ’टिमवि’त व्याख्यान
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
3
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
4
मंथरेच्या सल्ल्याने कैकयी दशरथावर रुसली!
5
बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत
6
वाचक लिहितात