नवी दिल्ली : देशांतर्गत प्रवाासी वाहनांच्या घाऊक विक्रीत सुमारे ८ टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यातील आकडेवारीनुसार ३ लाख ४४ हजार ६५६ वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी मे महिन्यात ३ लाख ४७ हजार ४९२ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. त्या तुलनेत ती कमी झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.या उलट दुचाकीच्या विक्रीत वाढ झाली. ती सुमारे २.२ टक्के वाढली. यंदा मे महिन्या १६ लाख ५५ हजार ९२७ वाहने विकली गेली. गेल्या वर्षी याच महिन्यात १६ लाख २० हजार ८४ दुचाकींची विक्री झाली होती,, अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चस संस्थेने दिली. एकंदरीत एकूण घाऊक विक्रीत १.८ टक्के वाढ झाली. यंदा २० लाख १२ हजार ९६९ वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी मे महिन्यात १९ लाख ७६ हजार ६७४ वाहनांची विक्री झाली होती.
Fans
Followers