ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हाच नव्या युगाचा वेध   

कुलगुरू डॉ. पांडे यांचे प्रतिपादन 

पुणे : ज्ञान आणि श्रद्धा यांचा समतोल साधत ज्योतिष शास्त्राचा अभ्यास हाच नव्या युगाचा वेध आहे, असे प्रतिपादन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी केले.श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव), पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. आणि अभिजीत प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठेतील विष्णूकृपा सभागृहात रविवारी ज्योतिष साधना महोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी पांडे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील पुरोहित होते. महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा श्वेता बोकील होत्या. पितांबरी प्रॉडक्टचे संतोष जोशी, अभिनेता हार्दिक जोशी, विजय जकातदार, सुनील पुरोहित, आनंद रेखी, आनंद दवे, मिलिंद पांडे, अर्चना सुरडकर, गोविंद कुलकर्णी, डॉ. ज्योती जोशी, सरिता पद्मन, अतुल आगरवाल उपस्थित होते. 
 
महोत्सवात ’ज्योतिश्री’ या मोबाईल पचे लोकार्पण करण्यात आले. तसेच स्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त विशेष सत्कार करण्यात आला. ’ज्ञानज्योती प्रतिष्ठान’ या नवीन संस्थेच्या उद्घाटनाचा मानही डॉ. पांडे यांना मिळाला. या कार्यक्रमात ज्योतिष विषयक नव्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. महोत्सवात श्री ज्योतिष संशोधन केंद्रचे साठ विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. 
 
डॉ. पांडे म्हणाले, इतर सर्व प्रकारच्या व्यवसायात असणार्‍या लोकांना जसे आपण त्या त्या विषयातील एंत्रप्रन्यअर म्हणतो, तसेच ज्योतिष शास्त्रानुसार व्यावसायिक असणार्‍या व्यक्तींना आपण अस्ट्रोप्रिन्युअर असे म्हणायला हवे. ज्योतिष शास्त्रात आज अंदाजे वीस लाखांहून अधिक ज्योतिष तज्ञ मंडळी या व्यवसायात कार्यरत आहेत, तसेच सध्या या क्षेत्रात पंचेचाळीस कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे, असेही पांडे यांनी स्पष्ट केले. 
 
डॉ. ज्योती जोशी म्हणाल्या, भविष्य शास्त्र वा ज्योतिष शास्त्र हा केवळ आर्थिक व्यावसाय न राहता, ती एक ज्ञान साधना व्हावी. पारंपरिक ज्योतिष शास्त्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याची विश्वासार्हता वाढेल यासाठी नवीन अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. प्रास्ताविक डॉ. ज्योती जोशी यांनी केले. हेमंत बर्वे यांनी सूत्रसंचालन यांनी केले.

Related Articles