श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्‍यांचा सन्मान   

वडगाव मावळ (वार्ताहर) : अखिल भारतीय वारकरी मंडळ, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान व विठ्ठल परिवार मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूरला पायी जाणार्‍या दिंडीतील वारकर्‍यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
 
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये हा कार्यक्रम झाला. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ज्येष्ठ नेते शंकरराव शेळके, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, सुखदेव महाराज ठाकर, संतोष महाराज काळोखे, मंगल महाराज जगताप, नितीन महाराज काकडे, दत्तात्रय महाराज शिंदे, महादू बुवा सातकर, देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, वारकरी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय महाराज लालगुडे, श्री विठ्ठल परिवाराचे अध्यक्ष गणेश महाराज जांभळे, माजी सभापती राजाराम शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, नारायण ढोरे, भरत म्हाळसकर, शांताराम काजळे, सुकन बाफना आदी उपस्थित होते. 
 
दिंडीतील तुळसीधारक महिला भगिनी यांना देवस्थानच्या विश्वस्त सुनीता कुडे यांच्या सहकार्याने साडी चोळी, सन्मानचिन्ह तर आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने विणेकर्‍यांना पोशाख व प्रत्येक दिंडीला वीणा देऊन सन्मानित करण्यात आले. 
 
वारकरी मंडळाच्यावतीने मधुकर महाराज गराडे, आनंद महाराज तळवडे व सदाशिव महाराज विकारी यांना निष्ठावंत वारकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. 
 
माजी मंत्री बाळा भेगडे, बाळासाहेब काशिद, संतोष महाराज काळोखे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर, देवस्थान अध्यक्ष किरण भिलारे, सुखदेव महाराज ठाकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विश्वस्त सुभाष जाधव व दत्ता महाराज शिंदे यांनी स्वागत केले. सचिव अनंता कुडे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष गणेश ढोरे यांनी आभार मानले. शंकरराव पगडे, शांताराम म्हाळसकर, किरण म्हाळसकर यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.

Related Articles