तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व   

इस्रायलचा दावा

तेल अवीव : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. संघर्षाच्या चौथ्या दिवशी इस्रायलने पश्चिम इराणपासून तेहरानपर्यंत हवाई क्षेत्रावर वर्चस्व मिळविले असल्याचा दावा केला आहे. आता इराणच्या राजधानीवरुन आमची विमाने मुक्तपणे उड्डाण करु शकतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे इस्रायलने म्हटले आहे.दरम्यान, क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलचे पाच जण ठार झाले, असा दावा इराणने केला आहे. इस्रायलवर शुक्रवारपासून १०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली असून, यात २२४ जणांचा बळी गेला असल्याचा दावादेखील इराणने केला आहे. 
 
इराण आणि इस्रायलच्या संघर्षात एक क्षेपणास्त्र तेल अवीवमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळ पडले. यात किरकोळ नुकसान झाले, असे अमेरिकेचे राजदूत माइक हकाबी यांनी सांगितले. 

Related Articles