जोफ्रा आर्चरचा इंग्लंडच्या संघात समावेश   

बर्मिंगहॅम  : भारतीय संघाविरुद्धच्या बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात रंगणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चरला पुनरागमनाची संधी दिली. जलदगती गोलंदाज जवळपास चार वर्षांनी कसोटी संघात परतलाय. याआधी 2021 मध्ये त्याने अहमदाबादच्या मैदानात भारतीय संघाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
 
जोफ्रा आर्चरचा घरच्या मैदानातील रेकॉर्ड जबरदस्त आहे.  इथं आतापर्यंत त्याने 8 कसोटी सामने खेळले असून यात त्याच्या खात्यात 30 बळीची नोंद आहे. दोन वेळा त्याने 5 बळी  घेण्याचा डावही साधघला आहे. भारतीय संघाविरुद्ध तो 2 कसोटी सामने खेळला असून यात त्याच्या खात्यात 4 विकेट्स जमा आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात 5 विकेट्सनं पराभवाचा सामना करावा लागलेल्या टीम इंडियासाठी जोफ्रा आर्चर डोकेदुखी ठरू शकतो. 
 
दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन,ओली पोप), जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, क्रिस वोक्स.

Related Articles