पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार   

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेत बेकायदा घुसलेल्या सुमारे ५ लाख स्थलांतरितांना देशाबाहेर हुसकावून लावणार आहे, असा इशारा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दिला आहे.या संदर्भातील घोषणा अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने केली आहे. स्थलांतरितामध्ये प्रामुख्याने हैती, क्युबा, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला या देशांतील नागरिकांचा समावेश आहे. त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून  अमेरिकेत राहण्यास परवानगी दिली होती. आता त्यांनी देशाबाहेर चालते व्हावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. 
 
ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात स्थलांतरितांना अमेरिकेत राहण्यास  परवानगी दिली होती. ही बाब सर्वस्वी चुकीची आहे, अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतली आहे. त्यानंतर अशा नागरिकांची हकालपट्टी करण्यासाठी पावले उचलणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. 

Related Articles