धुक्यातून मार्ग काढताना जीवघेणी कसरत   

महाबळेश्वरच्या रस्त्यांवर रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी

सातारा,(प्रतिनिधी) : जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरची ओळख असून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. सध्या पावसाळी हंगाम सुरू झाला असून जोरदार पाऊस दिवस रात्र धुक्याचे ही साम्राज्य मोठ्या प्रमाणा वरती पसरले असते अशा परिस्थिती मध्ये रात्रीच नाहीतर दिवसाच्या वेळेस. 
 
ही येथील रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना तारे वरची कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना जोरदार पाऊस त्याच्याच दाट धुक्यामध्ये रस्ता कुठे वळणे कुठे आहेत हेच वाहन चालकांना सहजा सहजी लक्षात येत नाही. पर्यटकां बरोबर स्थानिकांचा-रोनचा जाण्या येण्याचा रस्ता असूनही देखील स्थानिकांची सुद्धा वाहन चालवताना तारांबळ उडत असते. बर्‍याचदा बाहेरून आलेल्या पर्यटकाना धुक्यामध्ये नीट रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचा घटना या आधी घडल्या आहेत. 
 
महाबळेश्वर प्रतापगड भागात बर्‍याच रस्त्यांवरील मोर्‍यांना कठडे नाहीत याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेटर नाही तर येथील घाट परिसरात रस्त्यावर बर्‍याचदा छोट्यामोठ्या दरडी पावसा मध्ये कोसळत असतात यातच धुक्याचे प्रमाण देखील या रोड वरती जास्ती असल्याने धुक्यातून मार्ग काढणे अवघड जाते या साठीच रस्त्यांवरून प्रवास करणे सोपे जावे रस्ता लक्षात यावा या करिता येथील रस्त्यांच्या दुतर्फा चांगल्या प्रतीचे रिफ्लेक्टरलावण्याच्या गरज आहे. गेल्या काही वर्षा पासूनमहाबळेश्वर भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असून या मध्ये रस्त्याची देखील काम होत आहे, परंतु रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर सारखी छोटी पण धुक्यातून रस्ता काढणार्‍या एखाद्याचा जीव वाचेल एवढी महत्त्वाची गोष्ट जबाबदार अधिकार्‍यांच्या कशी निदर्शनास येत नाही हा संशोधनाचा विषय आहे यातच वारंवार रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी करून देखील बजेट नाही अशी कारणे देऊन अधिकारी जबाबदारी झटकत असल्याने आता जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष्य घालून रिफ्लेक्टर सारख्या छोट्या पण महत्त्वाच्या बाबींची दखल घ्यावी, अशी मागणी आता स्थानिक मधून होत असून लवकरात लवकर रस्त्याच्या दुतर्फा चांगल्या प्रतीच्या वीज रिफ्लेक्टर लावण्यात यावेत.अशी मागणी नागरिकांनामधून होत आहे.
 

Related Articles