छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा पाया रचला : राजाराम   

पुणे: देशात हजारो वर्षांपासून विषमता, भेदभावाचा सामना करणार्‍या दलित, पीडित, वंचितांसह बहुजन समाजाच्या ’सामाजिक न्याया’चा खरा पाया रचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत, असे मत बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र मुख्य प्रभारी व माजी खासदार राजाराम यांनी व्यक्त केले. 
  
शाहूनगरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज १५१ व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्ष, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महोत्सव’ आयोजित करण्यात आला. या महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमात, पोवाडे आणि मर्दानी खेळ घेण्यात आले. महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका निशा भगत आणि विशाल यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दयानंद मेटकर यांच्या चमू च्या वतीने फुले-शाहू-आंबेडकर यांच्या जीवनपटावर सादरीकरण करण्यात आले. 
 
राजाराम पुढे म्हणाले, शाहू महाराजांनी आपली राजसत्ता वापरून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना शिक्षण, रोजगार, सामाजिक समानता मिळवून दिली. हीच समता मिळवून देण्याचा विचार बसप चा आहे.यावेळी पुणे झोन प्रभारी रामचंद्र जाधव, अप्पासाहेब लोकरे, संजीवजी सदाफुले, किरण आल्हाट, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रविंद्र कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सातारा जिल्हाध्यक्ष लहरीदास कांबळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, सातारा जिल्हाध्यक्ष थारोडे, मुकुंद सोनावणे, सुनील शिंदे, राजेश चव्हाण, मनिष कावळे, बामसेफ चे रवींद्र चांदणे, अशोक रामटेके यांच्यासह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.

Related Articles