साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट   

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने गुपचूप साखरपुडा उरकला होता. बालपणीच्या मैत्रिणीसोबत त्याने साखरपुडा केला होता. याचे फोटोही त्यानेच इन्स्टावर पोस्ट केले होते. अचानक त्याने ते डिलीटही केले आहेत. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 
 
कुलदीपच्या होणार्‍या पत्नीचे वंशिका असे नाव आहे. ती कानपूरच्या एलआयसी कार्यालयामध्ये काम करते. कुलदीपच्या साखरपुड्याला रिंकू सिंह सह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती.
 
कुलदीपने हे फोटो का डिलीट केले याचे कारण समजलेले नाही. यामुळे कुलदीपचे चाहते हैराण झाले आहेत. कुलदीप सध्या इंग्लंड दौर्‍यावर गेला आहे. तिथे २० जूनपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. कुलदीप यादवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याचे लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. ४ जूनला त्यांचा साखरपुडा झाला होता. वंशिका आणि कुलदीप यादव हे बालपणीचे मित्र आहेत. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला आहे.

Related Articles