वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद   

सातारा, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशातील पर्यटक व ट्रेकर्स निसर्गप्रमी यांना भुरळ घातलेला व्याघ्रगड म्हणजेच किल्ले वासोटा पर्यटनासाठी सोमवार,  १६ जूनपासून बंद करण्यात येत असल्याची माहिती बामणोली वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिली. 
 
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रामध्ये असलेला निसर्गाच्या कुशीत वसलेला किल्ले वासोटा या ठिकाणी वर्षभर लाखो पर्यटक हे भेट देत असतात. मात्र, हेच पर्यटनस्थळ आता बंद करण्यात येत आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये या परिसरामध्ये प्रचंड पाऊस होतो. या कालावधीत जळवासह अनेक किटक व जीवणांची प्रादुर्भाव जाणवतो. त्यामुळे १६ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान हे पर्यटन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता किल्ल वासोटा दर्शन घेण्यासाठी येणार्‍या पर्यटक व ट्रेकर्स निसर्गप्रेमी यांना पाच महिने किल्ले वासोटा पर्यटन करता येणार नाही. दिवाळीनंतर वासोटा पर्यटन सुरू होणार आहे.

Related Articles