शेअर बाजार घसरला   

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीत निरंतर वाढ झाली. पण, सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. सेन्सेक्स ४५२ ने घसरुन ८३ हजार ६०७ वर बंद झाला. निफ्टी १२१ ने घसरुन २५ हजार ७१८ वर बंद झाला. 
 
अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, मारुती, अल्ट्रा टेक सिमेंट, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा स्टील, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांचे मूल्य घसरले. या उलट ट्रेंट, स्टेट बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टायटन आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या समभागांचे मूल्य वाढले. दरम्यान, अमेरिका आणि भारत यांच्यात होणार्‍या कराराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तो केव्हा होतो ? याकडे ते डोळे लावून बसले आहेत. करार झाल्यानंतर गुंतवणूक करण्याकडे त्यांचा कल असल्याचे एकंदरीत दिसते. पश्चिम आशियातील इस्रायल आणि इराण यांच्यातील १२ दिवसांचा संघर्ष संपल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले होते. दरम्यान, दक्षिण कोरिया, जपान आणि शांंघाय येथील निर्देशांक वाढले. हाँगकाँग आणि युरोपातील बाजारातील समभाग घसल्याचे दिसले. 
 

Related Articles