E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
उदयनराजेंच्या पाठपुराव्याला यश; उडान ५.५ योजनेतून होणार कार्यवाही
सातारा
, (वार्ताहर) : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालणार देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रस्ताव दिलेल्या धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या ’उडान ५.५’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे महाबळेश्वर, तापोळ्या पाठोपाठ धोम धरण परिसरातही पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
जिल्ह्यात सध्या पर्यटन विकासाला चालना देणारे प्रकल्प होत आहे. या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील धोम धरणात ’सी प्लेन’ सेवा सुरू करण्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हवाई वाहतूक मंत्रालयाला निवेदन दिले होते. सातारा लोकसभा मतदारसंघात विकासात्मक पर्यटन रोजगाराची प्रचंड संधी आहे. खासदार उदयनराजेंच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या उडान ५.५ या महत्त्वाकांक्षी योजनेत या प्रकल्पाचा समावेश केला असून, त्याअंतर्गत धोम धरणात ’सी-प्लेन’ सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. आता जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि दुर्गम भागातील स्थानिकांच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने नवीन महाबळेश्वरचा आराखडाही तयार केला आहे. त्यात अनेक प्रकल्प आणि सुविधांचा समावेश आहे. त्याच्याही अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. शिवसागर जलाशयाच्या आतील गावांना तापोळा, महाबळेश्वरशी जोडणार्या केबल स्टँड पुलांचे कामही प्रगतिपथावर आहे.वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर होणार्या या पुलावर प्रेक्षा गॅलरी असणार आहे. राज्य सरकार जावळी तालुक्यातील मुनावळे या गावात जलक्रीडा पर्यटन विकास प्रकल्प केला आहे, तसेच शिवसागर जलाशयामध्ये जागतिक स्तरावरील जलपर्यटनाची योजना देखील मंजूर केली आहे. त्याचेही काम सुरू आहे.
Related
Articles
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
सात हजारांहून अधिक भाविकांची तुकडी अमरनाथकडे रवाना
19 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
जनहित अर्ज सुविधेचा गैरवापर : न्यायालय
25 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
सात हजारांहून अधिक भाविकांची तुकडी अमरनाथकडे रवाना
19 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
जनहित अर्ज सुविधेचा गैरवापर : न्यायालय
25 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
सात हजारांहून अधिक भाविकांची तुकडी अमरनाथकडे रवाना
19 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
जनहित अर्ज सुविधेचा गैरवापर : न्यायालय
25 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
सात हजारांहून अधिक भाविकांची तुकडी अमरनाथकडे रवाना
19 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
जनहित अर्ज सुविधेचा गैरवापर : न्यायालय
25 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)