संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!   

पूल पडण्याची वाट पाहणार का?

सातारा, (प्रतिनिधी) : सातारा-कोरेगाव रस्त्यावर कृष्णा नदीवर बांधलेला पूलाला ११० वर्ष झाली आहेत. पुलाची १०० वर्षाची मुदत संपली आहे. नवीन पूल बांधण्यासाठी तीन वर्षापूर्वीच निवेदा काढण्यात आली आहे. सध्या पुलाचे काम सुरू आहे. परंतू हे  काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून तीन वर्षात फक्त एक पिलर उभा झाला आहे, असेच काम धिम्या गतीने झाले तर पुलाचे पूर्ण काम होण्यासाठी अजून पाच दहा वर्ष लागतील.
 
माहुली येथील पुलाला १०० वर्ष पूर्ण झाले असून बांधकामाची मुदत संपली आहे, असे ब्रिटिश सरकार असताना पुलाचे बांधकाम करणार्‍या कंपनीने महाराष्ट्र सरकारला लेखी कळवले आहे. याचा अर्थ माहुली पुलाच्या बांधकामाची मुदत संपून १० वर्ष झाली आहेत. तेव्हा कधीही पुलाला धोका निर्माण होऊ शकतो आणि अपघात होऊ शकतो. असे झाले तर सातारा जिल्ह्यातील पूर्व भागाचा पूर्ण संपर्क तुटू शकतो. तसेच दुर्दैवाने होणारी जिवितहानी आणि आर्थिक नुकसान होईल यात शंका नाही. त्यानंतर वृत्तपत्रात  बातम्या येतील कोणावर तरी गुन्हे दाखल होतील, पण होणारी जिवितहानी आणि आर्थिक नुकसान कधीच भरून येणार नाही. म्हणून एखादी वाईट घटना घडण्याची वाट बघण्यापेक्षा ती घडूच नाही म्हणून प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत.
 
यासाठी प्रशासनाने प्राधान्य देऊन माहुली येथील पुलाचे बांधकाम करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून लवकरात लवकर आणि दर्जेदार कसे होईल याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि भविष्यात होणारा अपघात व नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता यावर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.
 

Related Articles