बुलडाण्यात केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार?   

बुलडाणा : केस गळती, नख गळतीनंतर बुलडाण्यात आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार समोर आला आहे. खामगाव व शेगाव तालुक्यांमध्ये सुरू झालेला हा आजार आता चिखली व मेहकरसारख्या घाटमाथ्याच्या भागातही पसरला आहे. विशेषतः मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख गावातील २० गावकर्‍यांनी हाताला खोल भेगा पडत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे नोंदवल्या आहेत. याबाबात आरोग्य विभाग सतर्क झाला असून, आरोग्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन रूग्णांची तपासणी सुरू केली आहे. 
 
काही महिन्यांंपूर्वी जिल्ह्यातील नागरिकांनी अचानक केस गळणे आणि बोटांची नखे गळून पडण्याच्या गूढ आजारांचा अनुभव घेतला आहे. या प्रकारांना अनेक महिने उलटले असतानाही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचा अहवाल अजूनही लालफीतशाहीत अडकलेला आहे. त्यातच आता मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे विशेष पथक शेलगाव देशमुख येथे दाखल झाले. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने गावातील बाधित नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली.
 
एकूण २० रुग्णांची पाहणी करण्यात आली. यातील बहुतांश रुग्णांना इसबगोल  या त्वचाविकाराचे लक्षणे आढळून आली आहेत. हे रुग्ण मागील काही महिन्यांपासून या आजाराने त्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांवर मागील १ ते २ वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याचेही तपासणीतून निष्पन्न झाले आहे. हा आजार संसर्गजन्य नसून पाण्याशी याचा काहीही संबंध नाही, असे पथकातील डॉक्टरांनी म्हटले आहे. 
 

Related Articles