केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा   

डेहराडून : केदारनाथ येथील दुर्घटने प्रकरणी आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे दोन वर्षांची मुलगी, वैमानिकांसह सात जणांचे हाकनाक प्राण गेले, असा आरोप कंपनीवर ठेवला आहे. 
 
कंपनीचे बेल ४०७ हेलिकॉप्टर रविवारी पहाटे गौरीकुंंड परिसरात कोसळले होते. खराब हवामान आणि कमी दृष्यमाननेमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात प्रकरणी आर्यन एव्हिएशन कंपनीला जबाबदार ठरविले आहे. व्यवस्थापक कौशिक पाठक आणि विकास तोमर यांच्याविरोधात सोनप्रयाग पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १० आणि विमा कायदा  १९३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
 

Related Articles