बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच   

पणन संचालक विकास रसाळ यांची माहिती

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबतची चौकशी पुर्ण झाली आहे़. याबाबतचा अहवाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी दिली़बाजार समितीच्या चौकशीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे़  गेल्या दोन वर्षांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे़ तेव्हापासून बाजार आवारात अनेक अनियमित, बेकायदेशी आणि चुकीच्या पध्दतीने कामे झाल्याचा आरोप करण्यात आला होता़ याच पार्श्वभूमीवर पणन संचालकांनी चौकशीचे आदेश दिले होते़ याबाबत चौकशी अधिकारी म्हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती़ याबाबत चौकशी अधिकार्‍यांना तपासात सर्व प्रकारचे सहकार्य करण्याच्या सुचनाही बाजार समितीचे सभापती आणि सचिवांना दिल्या होत्या़
 
बाजारात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे़  बाजार समितीने भुसार बाजारातील १९ भुखंडधारकांना नोटीसा दिल्या होत्या़  त्यानंतरही प्रशासनाच्या आर्शिवार्दाने अनेक भुखंडांवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती़  याबाबत पणन संचालकांनी दिलेले चौकशीचे आदेश बाजार समितीने झुगारुनदिले होते़  फुलबाजारात गेल्या २० ते २५ वर्षांपासून परवाना मिळविण्याच्या प्रतिक्षेत असणार्‍या आणि व्यापारी होवू पाहणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलांना डावलून परवाने दिले होते़ याबाबतची चौकशी सुरु असताच पुन्हा ५६ परवाने दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़  मात्र प्रत्यक्षात ही संख्या १०० हून अधिक असल्याची चर्चा आहे़  
 
मांजरी उपबाजारात कोणतीही परवानगी न घेता तोडफोड करुन गाळ्यांची निर्मिती केली आहे़ यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे़ संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून अनेक ठिकाणी टपर्‍या थाटलेल्या दिसत आहेत़  यामध्ये संचालकांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचीही धक्कादायक बाब आहे़.

Related Articles