ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले   

नवी दिल्ली : ब्रिटनचे अमेरिकन बनावटीचे एफ ३५ लढाऊ विमान केरळच्या तिरुवनंपूरम आंतरराष्ट्रीय विमान तळावर तातडीने उतरवण्यात आले. विमानाच्या सुरक्षेसाठी ते उतरल्याची पूर्ण कल्पना असल्याची माहिती हवाई दलाने दिली. लढाऊ विमानाने ब्रिटनच्या एखाद्या विमानवाहू र्नाकेवरुन उड्डाण केले असावे. अचानक विमानातील इंधन कमी झाल्याने संकट निर्माण झाल्याने ते तातडीने केरळ येथे उतरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते विमानतळावर सुखरुप उतरले होते. त्यासाठी भारतीय हवाई दलाने सहकार्य केले होते.
 

Related Articles