आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे फायदे पोहोचविण्यासाठी मोहीम   

पुणे : आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्या ध्येयाला पुढे नेत, देशातील सर्वांत मोठ्या सायन्स-बेस्ड आयुर्वेद कंपनी डाबर इंडियाने पुदिना या वनस्पतीला ‘वंडर हर्ब’ म्हणून गौरवण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम पुण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात सुरू झाली. या कार्यक्रमाला डॉ. काजल कोडितकर, डॉ. निकिता जगताप आणि डाबर इंडियाचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स मॅनेजर दिनेश कुमार उपस्थित होते. डॉ. निकिता जगताप म्हणाल्या, पुदिनामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स मुबलक प्रमाणात असतात. 
 
डाबर इंडियाचे हेल्थकेअर मार्केटिंग प्रमुख अजय परिहार म्हणाले, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोक एकाच वेळी अनेक कामे करत आहेत आणि त्यांना नैसर्गिक व प्रभावी उपायांची गरज आहे. डाबर ही देशातील सर्वांत विश्वासार्ह आरोग्य सेवा देणारी कंपनी म्हणून पारंपरिक आयुर्वेदाच्या माध्यमातून दैनंदिन आरोग्य समस्यांवर उपाय देण्याचे आपले वचन अजून बळकट करत आहे.

Related Articles