लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा   

३०० बंदुका, २० पोती काडतुसे जप्त

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या मलिहाबादमध्ये बेकायदा शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यात ३०० बंदुका, २० पोती भरुन काडतुसे आणि शस्त्रे बनवण्याचे साहित्याचा समावेश आहे.
 
एका हकीमाच्या घरात शस्त्रसाठा जप्त केला आहे. सल्लाउदीन ऊर्फ लाला (वय ७१), असे त्याचे नाव आहे. त्याला पत्नी दोन मुली आहेत.  पत्नी, एका मुलीची आणि आणि युवकाची चौकशी केल्यानंतर सल्लाउद्दीन याला अटक करण्यात आली. परिसर पोलिसांनी सीलबंद केला आहे. संबधित व्यक्ती तेथे शस्त्र निर्मिती करत असल्याचे जप्त केलेल्या साठ्यातून स्पष्ट होत आहे. 
 
जिल्हा पोलिस अधिकारी जितेंद्र दुबे यांनी सांंगितले की, घनदाट वस्तीत घर आहे. तेथे शस्त्र निर्मिती केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. अनेक तास कारवाई सुरू होती. त्यात ३०० बंदुका, २० पोती भरून काडतुसे आणि शस्त्र निर्मितीचे साहित्य जप्त केले. 
 

Related Articles