डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख   

अहमदाबाद विमान दुर्घटना

अहमदाबाद : अहमदाबाद ते लंडन प्रवास करणार्‍या विमानाच्या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ४७ जणांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटविण्यात यश आले आहे. त्यापैकी १८ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची ओळख देखील डीनएन चाचणीद्वारे पटविण्यात आली असून त्यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविला आहे. 
 
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी गुजरात आणि राजस्तानातील विविध भागांतील मृतदेहांची ओळख आतापर्यंत पटली आहे. अनेक प्रवाशांचा दुर्घटनेत होरपळून मृत्यू झाला होता. अनेकांच्या मृतदेहाचा कोळसा झाला आहे. त्यामुळे त्यांंची ओळख पटविण्याचे काम अवघड बनल्यामुळे डीएनए चाचणी करुन ते जुळल्यावर मृतदेह नातेवाईकांना सोपवले जात आहेत. मृतदेह प्रामुख्याने उदयपूर, वडोदरा, खेडा, मेहसाना, अरावली, अहमदाबाद आणि बोताड जिल्ह्यांतील आहेत. दरम्यान नातेवाईकांंशी संपर्क आणि समन्यवयासाठी २३० पथके तयार केली आहेत. दुर्घटनेत विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला होता. ब्रिटनचा एक प्रवासी बचावला होता. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या इमारतीवर विमान कोसळले होते. तेव्हा वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसह २९ जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेत  २७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
 

Related Articles