‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?   

इराणचा दावा; इस्रायलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे 

तेहरान/ जेरुसलेम : इस्रायलने इराणवर आक्रमक हवाई हल्ले करुन अणु प्रकल्प आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर देत तेल अवीवसह चार शहरांवर जोरदार क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यात बॅलेस्टिक आणि स्वनातीत क्षेपणास्त्रांचा समावेश होता. हल्ल्यात तेल अवीव येथील मोसदचे मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणने केला आहे.   
 
 इराण आणि इस्रायल यांच्यातीत अंतर सुमारे दीड हजार किलोमीटर आहे. दोन्ही देशांच्या सीमा एकमेकाशी सलग्न नाहीत. त्यामुळे एकमेकांवर हवाई हल्लेच त्यांना करता येतात. त्या अंतर्गत शुक्रवारी सकाळी इस्रायलने अणु प्रकल्प आणि लष्करी तळांना हवाई हल्ले करुन लक्ष्य केले होते. त्यात दोन वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाले होते. तसेच सहा अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला होता. २० हून अधिक नागरिक आणि ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. यानंतर इराणने देखील इस्रायलवर आक्रमक हवाई केले. त्यात २०० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रांचा ड्रोनचा वापर केला. त्यात बॅलेस्टिक आणि स्वतनातीत क्षेपणास्त्रांचा समावेश होता. इस्रायलची चार शहरे तेल अवीव, जेरूसालेम, हायफा आणि आणखी एकावर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. त्यामुळे इस्रायली नागरिकांची आणि सुरक्षा रक्षकांची पळापळ झाली. अनेक  इमारतींची पडझड झाली . दरम्यान, ५० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. 
 
लष्करी तळांवर हल्ले करु;अमेरिका, ब्रिटनला इशारा
 
अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी इराणचे हल्ले थांबवण्यास  इस्रायलला मदत केली, तर इराणच्या परिसरातील त्यांचे तळ आणि जहाजे  यांना लक्ष्य केले जाईल, असा जाहीर इशारा इराणने तिन्ही देशांना दिला आहे. इस्रायलवरील इराणचे हल्ले परतवून लावण्यात सहभागी होणारा कोणत्याही देशांना आक्रमक कारवाईला सामोरे जावे लागेल. पर्शियन आखाती देशांमधील या तिन्ही देशांचे लष्करी तळ आणि लाल समुद्रातील जहाजे आणि नौदल जहाजांवर आम्ही हल्ले करु, असा इशारा इराणने दिला आहे. .
 
इस्रायलविरुद्ध दंडात्मक कारवाई
 
इस्रायलच्या दहशतवादी आणि क्रूर कृत्याला प्रत्युत्तर म्हणून दंडात्मक कारवाई करणे आवश्यक होते, असे खामेनी यांनी मेहर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.दरम्यान, इराणच्या अणु सुविधांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर किरणोत्सर्ग झाला नसल्याचे आणि त्यात वाढ झाली नसल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने म्हटले आहे.
 
अमेरिकेबरोबर अणु करार करणार नाही : खामेनी
 
कोणताही अणु करार करणार नाही, असे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी शनिवारी अमेरिकेला ठणकावले आहे. अमेरिकेचा पाठिंबा इस्रायलला आहे. त्यामुळे अणु कार्यक्रमात अडथळे आणण्यासाठी हल्ला केला आहे. त्यामुळे आता अमेरिकेसोबत कोणताही अणु करार केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अमेरिकेचे इराणसोबत अणु करार करण्याचे स्वप्न भंगल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले असून त्यानी पशिैयन आखातात नौदलाची जहाजांची तुकडी रवाना केली असल्याचे वृत्त आहे.
 
आयर्न डोम कुचकामी ठरले?
 
इस्रायलच्या संरक्षणाच्या भात्यातील संरक्षक अस्त्र आयर्न डोम आहे. एका पाठोपाठ येणार्‍या क्षेपणास्त्रांनी त्याला देखील चकवा दिल्याचे दिसून आले. अनेक क्षेपणास्त्रे रहिवासी वस्तीवर कोसळल्याचा दावा केला. त्यात मोसादचे तेल अवीव येथील मुख्यालयाचा समावेश असल्याचा दावा इराणच्या संरक्षण विभागाने केला. इराणने प्रथमच समुद्रातून इस्रायलवर हल्ला केला आहे. त्यात पाणबुडीतूनही अनेक क्षेपणास्त्रे डागली होती. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, अनेक क्षेपणास्त्रे शहरांत जरुर पडली आहेत. मात्र, ती मोकळ्या जागेत पडली. त्यामुळे फारसे नुकसान झालेले नाही. तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

Related Articles