अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार   

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रवास करण्यासाठी निवड झालेले भारतीय अवकाशवीर शुभम शुक्ला हेत गुरुवारी अन्य तीन अवकाशवीरांसह स्थानकाकडे  अवकाश यानातून झेपावणार आहे.ऑक्सिओम- ४ ही व्यावसायिक अवकाश मोहीम नासाने आखली आहे. त्यात शुभम याचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रोने) दिली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या जॉन एफ केनेडी अवकाश केंद्रावरुन अवकाश यात्री आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने स्पेस एक्स फाल्कन ९ रॉकेटच्या माध्यमातून झेपावणार आहेत. यापूर्वी  २९ मे रोजी त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे पाठवण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळी रॉकेटमध्ये द्रवरुप ऑक्सिजनमध्ये गळती झाली होती. त्यामुळे मोहीम लांबणीवर पडली होती. आता मोहीमेसाठी १९ जून (गुरुवार) ही तारीख ठरविण्यात आली आहे. 

Related Articles